Video : अभिनेता राहील आझम सांगतोय व्यत्त्किमत्त्वाप्रमाणे करा शरीरयष्टीत बदल

राहील आझम, अभिनेता
Tuesday, 25 February 2020

तुम्हाला नेहमीच फिट राहणे आवश्‍यक आहे आणि व्यक्तिमत्त्वाप्रमाणे तुम्हाला स्वतःमध्ये बदल करणे जमलेच पाहिजे. सांगतोय अभिनेता राहील आझम... 

माझा दुबळ्या शरीरयष्टीवर कधीच विश्‍वास नव्हता. पण, ‘दिल जैसे धडके..धडकने दो’मधील देव गुरूच्या भूमिकेसाठी मला बरेच वजन कमी करावे लागले. तुम्हाला नेहमीच फिट राहणे आवश्‍यक आहे आणि व्यक्तिमत्त्वाप्रमाणे तुम्हाला स्वतःमध्ये बदल करणे जमलेच पाहिजे. सांगतोय अभिनेता राहील आझम... 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तुझे फिटनेस रुटीन कसे असते? 
राहील : मी साधारण आठवड्यातील चार दिवस वेट ट्रेनिंग करतो. उरलेल्या दिवसांत माझ्या शेड्यूलप्रमाणे कार्डिओ आणि ॲब्ज करतो. वेट ट्रेनिंगमध्ये मी पुशअप आणि पुलअप्स मारतो. पुशअप एक्‍सरसाईज करताना मी माझी छाती, खांदे आणि ट्रायसेप्सवर आणि पूल एक्‍सरसाइजमध्ये पाठ, बायसेप्सवर लक्ष देतो. इतर दिवशी मी माझ्या पायांवर काम करतो. विद्यार्थिदशेपासून मी तज्ज्ञांची मदत घेऊन, योग्य ते प्रशिक्षण घेऊनच व्यायाम केला. 

तुझा आहार कसा आहे? 
राहील : मी लो कार्बडाएट करतो. दिवसभरात पाच वेळा जेवतो. ज्यामध्ये तीन ते चार तासांचे अंतर असते. अनेकदा आठवड्यातून एकदा किंवा दहा दिवसांतून एकदा चीट मिल घेतो. मला साखरेचा चहा खूप आवडतो, त्यामुळे तो रोज पितो. माझे डाएट पाच-सहा आठवड्यांनी बदलत असते. तुम्ही खाता त्याचा आनंद घेतला पाहिजे. पण, योग्य प्रमाणात खा, योग्य व्यायाम करा आणि निरोगी राहा. जेव्हा जेव्हा मला बॉडी शॉट्‌स द्यायचे असतात तेव्हा मी दोन आठवडे मीठ टाळतो. 

फिटनेसबाबत आव्हान स्वीकारावे लागले? 
राहील : ‘हातिम’मध्ये काम करण्यापूर्वी माझी बॉडी चांगली होती. ‘हातिम’नंतर प्रत्येक जण दणकट शरीरयष्टी ठेवण्याकडे झुकू लागला होता. माझा दुबळ्या शरीरयष्टीवर कधीच विश्‍वास नव्हता. पण, ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘दिल जैसे धडके..धडकने दो’ या मालिकेमधील देव गुरूच्या भूमिकेसाठी मला बरेच वजन कमी करावे लागले. तुम्हाला नेहमीच फिट राहणे आवश्‍यक आहे आणि तुमच्या भूमिकांप्रमाणे स्वतःमध्ये बदल करणे जमलेच पाहिजे. चित्रीकरण करत असो किंवा नसो रोज व्यायामाचा नियम मी कधीही मोडत नाही. 

फिटनेसबद्दल आदर्श कोण? 
राहील : आम्ही सिल्वेस्टर स्टॅलोन, आर्नोल्ड श्‍वार्झनेगर यांना पाहत मोठे झालोय, ते माझ्या आयुष्यातील खूप मोठे प्रेरणास्थान आहेत. नव्वदच्या दशकात संजय दत्तची शरीरयष्टी आकर्षक होती. सलमान खानचीही शरीरयष्टी बरीच वर्षे टिकून आहे. अक्षय कुमारला माझा सलाम. कारण त्यांनी स्वत:ला खूप सांभाळले आहे. 

शब्दांकन ः अरुण सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Rahim Azam is telling make personal changes to your personality