आरोग्य अन्‌ प्रक्रियेसाठी हळद, आले

Turmeric-Ginger
Turmeric-Ginger

हळद पावडर तयार करण्यासाठी प्रथम जाड मोठ्या हळकुंडाचा यंत्रामध्ये भरडा केला जातो. यंत्राच्या साह्याने भरड्यापासून पावडर तयार केली जाते. ही पावडर वेगवेगळ्या जाळीतून काढली जाते. शेवटी ३०० मेश जाळी मधून हळद पावडरीची प्रतवारी होते. 

कुरकुमीन 
वाळलेल्या हळद पावडरपासून इथाईल अल्कोहोल हे द्रावक वापरून कुरकुमीन नावाचा घटक वेगळा काढता येतो. हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण जातिपरत्वे २ ते ६ टक्के इतके असते. 
कुरकुमीनपासून अनेक आयुर्वेदिक औषधे तसेच अनेक सौंदर्य प्रसाधने बनविता येतात. जातिपरत्चे हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण बदलते. 

कुंकू 
हळदीचे गड्डे मुख्यत : कुंकू तयार करण्यासाठी वापरतात. 

रंगनिर्मिती 
लोकरी, रेशमी, सुती कपड्याला पिवळा रंग देण्यासाठी हळदीचा उपयोग करतात. सध्या काही प्रमाणात सुती कपड्यांना हळदीचा रंग देतात.
औषधे, कन्फेक्शरी उद्योगात हळदीचा रंगासाठी उपयोग होतो. वॉर्निश उद्योगातही हळदीचा उपयोग होतो.

सौंदर्य प्रसाधने 
वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये, तसेच साबणांमध्ये हळदीच्या गुणधर्माचा उपयोग केलेला आढळतो. स्नानापूर्वी चेहऱ्याला व शरीराला हळद लावल्यास त्वचेला चकाकीपणा येतो. चेहऱ्याचे सौंदर्य वाढते.

सुगंधी तेल 
हळद ही मुळातच औषधी व गुणकारी असल्यामुळे तिच्यापासून सुगंधी तेल काढता येते. हळदीच्या ताज्या गड्ड्यापासून ५ ते ६ टक्के तेल मिळते. हे तेल नारंगी पिवळ्या रंगाचे व हळदीसारखा सुवास असणारे असते.

हळदीचे संप्लवनशील तेल
हळदीमध्ये ३.५ टक्के संप्लवनशील तेल असते. हे तेल पिवळ्या रंगाचे असून, हे वेगळे काढण्यासाठी हळदीच्या पुडीचे पाण्याच्या ऊर्ध्वपातन पद्धतीचा वापर करतात. 
हळदीच्या तेलात ६ टक्के टरमतेरोन्स व २५ टक्के झिंगीबेरन असते.

ओलेओरेझीन निर्मिती 
हळदीच्या भुकटीपासून ओलेओरेझीन काढण्याची पद्धत म्हैसूरच्या केंद्रीय अन्नतंत्र संशोधन संस्थेत प्रमाणित केली आहे. रंग व स्वादाकरिता त्याचा उपयोग औषधे व खाद्य पदार्थांमध्ये करतात.

याचे शेकडा प्रमाण ५ ते ७ टक्के असून, त्यातील व्होलाटाईल तेलाचे प्रमाण १८ ते २० टक्के आहे.

औषधे निर्मिती  
आयुर्वेदात हळदीचे कडू रस, उष्णवीर्य, रुक्ष, कृमीहर असे गुण सांगितले आहेत. औषधी तेल व मलम यामध्ये हळदीचा उपयोग करतात. हळद ही पाचक, कृमिनाशक, शक्तिवर्धक व रक्तशुद्ध करणारी आहे.

आल्याचे औषधी गुणधर्म 
आले सेवनामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते.आल्यामध्ये ९१ टक्के पाणी २.५ टक्के प्रथिने, १३ टक्के कार्बोहायड्रेट असतात.
आल्याचे बारीक काप करून त्याचे तुकडे व एकसारख्या प्रमाणात मधासोबत गरम करून दिवसातून दोन-तीन वेळा खावे. खोकला येणे बंद होते. त्याचसोबत घशातील खवखवसुद्धा कमी होते.
भूक लागत नसेल तर आल्याचे नियमित सेवन करावे. त्याने तुमचे पोट साफ होते. तुम्हाला भूकही लागते.
आल्यामध्ये ओवा आणि लिंबाचा रस एकत्र करून त्यात थोडे  मीठ टाकून खावे. त्यामुळे पोटाचे आजार कमी होतात. ढेकरही येत नाही.
सर्दी झाल्यावर आल्याचा चहा पिणे फायदेशीर असते
आल्याचा रस कोमट पाण्यात १ चमचा टाकून प्यावे. तोंडातील दुर्गंधी ताबडतोब जाते.
ताज्या आल्याची फोड तोंडात ठेवल्यास उचकी थांबते.
आल्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असते. त्यामुळे रक्ताच्या गाठी बनण्यास प्रतिबंध करता येतो. 
डोके दुखत असल्यास आल्याचा चहा प्यावा डोकेदुखी कमी होते.
आल्यामध्ये जीवनसत्त्व अ क इ आणि बी कॉप्लेक्स, मॅग्नेशिअम,  सिलिकॉन, सोडिअम, लोह, खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. 
कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी व अर्ध शिशी आजारांमध्ये उपयुक्त आहे.


सौ. कीर्ती देशमुख,८२७५४१२०६३ (कृषी विज्ञान केंद्र, अकोला) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com