कार्यालयात खुर्चीत बसूनही करता येईल व्यायाम; 'हे' आहेत प्रकार

मनाली देव
Monday, 9 December 2019

आज आपण कार्यालयात बसून शरीराला ताण देण्याचा एक सोपा प्रकार पाहणार आहोत. अनेकजणांना बैठे काम करावे लागते. खूप वेळ खुर्चीवर बसून राहिल्याने पाठीला रग लागते. मान दुखते. ॲसिडिटी होते. हा त्रास कमी करण्यासाठी याचा उपयोग होईल. त्यासाठी फक्त पाच मिनिटे दिवसातून दोन वेळा हा प्रकार करायचा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

प्रथम खुर्चीवर ताठ बसावे. दोन्ही तळपाय खाली टेकलेले असावेत. दोन्ही पायांमध्ये साधारणपणे खांद्याएवढे अंतर घ्यावे. त्यानंतर श्‍वास सोडत कंबरेतून डाव्या बाजूला वळावे. या अवस्थेत पाच ते दहा सेकंद स्थिर राहावे. त्यानंतर पूर्वस्थितीत यावे. पुन्हा श्‍वास सोडत उजव्या बाजूला वळावे. याही अवस्थेत पाच-दहा सेकंद स्थिर राहावे. प्रत्येक स्थिती आलटूनपालटून दोन-तीन वेळा करावी.

Image may contain: 1 person, sitting

छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे हाताची स्थिती ठेवावी. ताणाच्या या प्रकारात कंबर, पाठ, पोट हे उत्तम पिळले जातात. त्यामुळे, तेथील स्नायू, शिरा यांचे कार्य सुधारते. पोटातील अवयवांना पीळ बसून दाब आल्याने वात, ॲसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठता इ. त्रास कमी व्हायला मदत होते.

हेही वाचा : योगासने आणि फायदे

मधुमेह असणाऱ्यांनी हा प्रकार नक्की करावा. अतिरिक्त चरबी कमी होण्यास, पोटाला हलकेपणा येण्यास मदत होते. पाठ व कंबरेला पीळ बसल्याने तेथील दुखणे कमी होते. लवचिकता वाढते. वात कमी होतो. मणक्याची सुदृढता वाढते. त्यामुळे कार्यालयीन कामातून दिवसभरातून पाच मिनिटे वेळ काढून ताणाच्या या प्रकाराचा नक्की सराव करावा.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about exercise in the office