वजन घटविण्यासाठी ग्रीन टी

वजन घटविण्यासाठी ग्रीन टी

हल्ली प्रत्येक जण वाढलेले वजन आणि त्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र पाहायला मिळते. व्यायाम, योगासने, जिम यांच्या जोडीला हेल्दी डाएट याला प्रत्येकच जण महत्त्व देतो. त्यासाठी मध-पाणी, लिंबू-पाणी असेही पर्याय निवडले जातात. त्याच्या जोडीला ग्रीन टी हा पर्यायही हल्ली चर्चेत आहे आणि फिटनेसची काळजी घेणारे त्याचा उपयोग करीत आहेत. ग्रीन टीचा उपयोग वजन कमी करण्याबरोबरच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी (डी-टॉक्स) व फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळण्यासाठीही होतो. तुम्हाला बाजारात ग्रीन टी सहज उपलब्ध होतो. मात्र, घरच्या घरी ग्रीन टी बनवायचा असल्यास पुढील पद्धत तुमच्या नक्कीच उपयोगी पडेल. 

रेसिपी
साहित्य 
एक ग्लास पाणी, ३ ते ४ तुळशीची पाने, पाव चमचा आले, अर्धा चमचा दालचिनी, मेथीचे दाणे, २ चमचे लिंबाचा रस.

कृती
भांड्यात एक ग्लास पाणी घ्या व ते मंद आचेवर गरम करायला ठेवा
पाणी गरम झाल्यावर त्यात तुळशीची पाने, आले, दालचिनी घाला व मेथीचे दाणे. 
तुळशीच्या पानांत ॲन्टिऑक्सिडंट आणि ॲन्टिइन्फ्लेमेंटरी गुणधर्म असतात व सर्दी-पडसे-ताप यांपासून बचाव होतो. आल्यामध्ये ॲन्टिव्हायरल आणि ॲन्टिबॅक्टिरिअल गुणधर्म असतात. पचनशक्ती सुधारण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. शेवटी मेथीचे दाणे घाला. मेथीच्या दाण्यांमुळे शरीरातील इन्शुलीनची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 
    गॅसवरून उतरवल्यावर त्यात दोन चमचे लिंबाचा रस घाला. 
    गरम असताना प्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com