लाइफस्टाइल कोच : 'न्यू नॉर्मल' जीवनशैलीचा करू श्रीगणेशा

Lifestyle-Coach
Lifestyle-Coach

कोरोनाच्या महासाथीने आपल्या सगळ्यांच्या जीवनशैलीवर इतका परिणाम घडवून आणला आहे, की आपल्याला नव्याने विचार करणे आणि नवे बदल आत्मसात करणे अपरिहार्य आहे. आपल्या आरोग्यावर इतका मोठा परिणाम झाल्याने आता आरोग्यात गुंतवणूक करण्याची वेळ आली आहे. महासाथीने आपले डोळे उघडले आहेत, ‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’ या उक्तीला नवे आयाम दिले आहेत आणि चांगले आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे लक्षात आणून दिले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी किंवा खरे तर कोणत्याही आरोग्यविषयक समस्येशी लढण्यासाठी कमाल प्रतिकारशक्ती असणे महत्त्वाचे आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रतिकारशक्ती बऱ्याच अंशी आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असते. आपली सध्याची जीवनशैली कशी आहे आणि ‘न्यू नॉर्मल’ जीवनशैलीचे  सहा मंत्र कोणते आहेत, ते पाहू. 

दृष्टीकोनातला बदल
बदलाला सामोरे जाण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो, मात्र सकारात्मक दृष्टिकोन आणि कृतीच नाही, असे असल्यास ते शिजवलेले अन्न. सगळे घटक असले, तरी ते खाता येणार नाहीत. त्यामुळे जलद कृती करा, भीती आणि नकारात्मकता सोडून द्या आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करा. या प्रक्रियेतली ही सगळ्यांत पायरी महत्त्वाची आहे. 

स्वतःची काळजी
कोरोनाच्या काळात वैयक्तिक आरोग्य राखणे आणि स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तुमचे हात वेळोवेळी धूत राहा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळा आणि ही सवयच लावून घ्या. 

अन्नसेवनाची योग्य पद्धत (माइंडफुल इटिंग) -
अन्नाचा प्रत्येक घास व्यवस्थित सेवन करा. कोरोनाने आपल्या अन्नसेवनाच्या सवयींचा गांभीर्याने फेरविचार करण्याची संधी दिली आहे. या संसर्गाचे गंभीर परिणाम होऊ नयेत यासाठी ओबेसिटी आणि रक्तदाब, मधुमेह यांसारख्या इतर रिस्क फॅक्टर्सचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. त्यांतून हृदयरोगाशी संबंधित इतर गुंतागुंतीसुद्धा वाढू शकतात. तुमच्या आरोग्याचा पाया अतिशय बळकट करा- त्यासाठी पहिल्यांदा स्वतःला ‘न्युट्रिशनली फिट’ बनवा.

जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगू नका. अन्नसेवनाच्या सवयी आरोग्याशी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याशी निगडित असाव्यात प्रतिकारशक्ती वाढवून तुम्ही कोणत्याही आरोग्यविषयक समस्येचा परिणाम किंवा तीव्रता कमी करू शकता.

  • घरी तयार केलेले ताजे अन्नच खाण्याचा नेम सुरू करा. जंक फूड आणि गोडाचे पदार्थ टाळा. 
  • योग्य वेळी जेवणाचे महत्त्व लक्षात घ्या. 
  • आपल्या आजी-आजोबांच्या पिढीतले लोक काय करत होते, ते आठवा. त्यांची जीवनशैली, भाज्या आणि फळे खाण्याच्या त्यांच्या सवयी, त्यांच्या जेवणाच्या वेळा आणि पद्धती इत्यादी पाहा. आपल्या बेसिक्सवर परतण्याची वेळ आता आली आहे. तुमच्या आजीच्या काळातल्या पदार्थांकडे पुन्हा वळा. 
  • शरीर कमाल क्षमतेने कार्यरत राहण्यासाठी किती खाणे आवश्यक आहे, ते समजून घ्या. 
  • रात्रीचे जेवण लवकर घेणे महत्त्वाचे. 

पोष्टिक आहार केवळ शरीराबरोबर मानसिक आरोग्याही सुधारतो. त्यामुळे त्याबाबत कृती नक्की करा. ‘न्यू नॉर्मल’ जीवनशैलीत काय करायला पाहिजे याबाबतचे आणखी तीन कानमंत्र आपण पुढच्या भागात. 
(क्रमशः) 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com