हेल्थ + : स्त्री आणि आरोग्य

डॉ. सुमेधा भोसले, स्टेट्स हेल्थ क्लब प्रा. लि.
रविवार, 8 मार्च 2020

आजच्या काळामधील स्त्री.... स्वतंत्र, स्वावलंबी, सक्षम, मुक्त... खरोखरच स्त्रीने सर्व क्षितिजे पादाक्रांत केली आहेत. सर्व जबाबदाऱ्या आणि स्त्रीत्वदेखील अगदी सक्षमपणे सांभाळत आहे. मात्र, या धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे, तंदुरुस्तीकडे लक्ष देतेय का?

आजच्या काळामधील स्त्री.... स्वतंत्र, स्वावलंबी, सक्षम, मुक्त... खरोखरच स्त्रीने सर्व क्षितिजे पादाक्रांत केली आहेत. सर्व जबाबदाऱ्या आणि स्त्रीत्वदेखील अगदी सक्षमपणे सांभाळत आहे. मात्र, या धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे, तंदुरुस्तीकडे लक्ष देतेय का?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आगामी काळात ‘वाढणारे वजन’ आणि त्या अनुषंगाने होणारे कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, सांधेदुखी यांसारखे गंभीर आजार स्त्रियांसाठी आव्हान ठरू पाहत आहेत. त्यातच वजन कमी करण्यासाठी सतत जाहिरातींचा भडिमार होत आहे. व्हॉट्सॲप, सोशल मीडियामधून अफाट, अचाट, अद्‍भुत, वाट्टेल त्या माहितीचा भडिमार होत असतो. वजन तर कमी होतच नाही, मनस्ताप मात्र होतो.

कोणी सांगते दिवसातून दोनच वेळा जेवा व १६ तास उपाशी राहा, तर कोणी सांगते दर २ तासांनी खातच राहा! फक्त प्रथिने खा, केटो डाएट करा.... व्यायामाशिवाय वजन कमी करा..... अशा उपायांमुळे वजन तात्पुरते घटतेही, मात्र काही दिवसांनी पूर्ववत होते. खरेतर वैद्यकीय शास्त्र सांगते, दर ३ ते ४ तासांनी पोट रिकामे होते. त्यामुळे पोटभर नाश्ता, छान जेवण, मधले खाणे आणि सायंकाळी हलके जेवण असा आहार असावा. मात्र, आहार योग्य उष्मांकाचा, पोषण मूल्यांनी युक्त, पोटभर व आवडीचा असावा. तंदुरुस्ती तर हवीच, त्यासाठी व्यायाम हा एकमेव उपाय आहे. फक्त चालणे कसे चालेल? स्नायूंची शक्ती, चिकाटी वाढवण्यासाठी जिमचे व्यायाम, स्टॅमिना वाढवणारे ॲरोबिक्सचे व्यायाम, लवचिकता वाढवणारे योगासने, प्राणायाम करूनच तंदुरुस्ती वाढेल. 

सख्यांनो, आता आपल्या तंदुरुस्तीकडे आणि आरोग्याकडे अधिक शास्त्रोक्त दृष्टिकोन ठेवू या. तणावमुक्त होऊन आनंदी राहू यात, स्त्रीत्व परिपूर्णतेने उपभोगूयात. 
महिला दिनाच्या आरोग्यपूर्ण शुभेच्छा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr sumedha bhosale on women and health