चेतना तरंग : या ग्रहावर राहणे हीच देणगी!

Sri Sri Ravishankar
Sri Sri Ravishankar

आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या अनुभवांकडे पाहिल्यास २०२० या वर्षाने आपल्याला बरेच काही दिले आहे. या वर्षातील अनुभवांनी आपल्याला जास्त बळकट आणि लवचीक केले आहे. प्रत्येक घटनेमध्ये आपल्यासाठी काही हितावह किंवा अहितकर असते. हितकर गोष्टींमुळे प्रसन्नता मिळते आणि मनात शांती आणि निःस्पंदता येते. तसेच, प्रतिकूल परिस्थितीमुळे आपण बळकट होतो आणि मोठी उद्दिष्टे कळून येतात.

या ग्रहावर राहणे ही आपल्याला फार मोठी देणगी मिळाली आहे. आपण या ग्रहावर आपले जीवन एक भेट म्हणून पाहू लागतो, तेव्हा जीवनाप्रती आपला संपूर्ण दृष्टिकोनच बदलून जातो. यावर्षी लॉकडाउनच्या काळात विश्वभरातून लाखो लोक व्हर्च्युअली दिवसातून दोन वेळा ध्यान करण्यासाठी एकत्र आले आणि त्यांनी या गोंधळामध्ये मनातील  शांतीचा अनुभव घेतला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावर्षी वैश्विक महामारीच्या काळात विश्वभरात लाखो लोक अस्वस्थ झाले. त्यांना भीती आणि चिंतेने ग्रासले. कित्येकांनी आपले प्रियजन गमावले. म्हणून लोकांना आश्चर्य होत आहे की, नवे वर्ष कसे साजरे करायचे?  किती तरी लोकांनी आपले जीवन गमावले, मग आनंद कसा साजरा करायचा?  त्यांना अपराधीपणाची भावना होते आहे. पाहा, जर तुमचे आनंद साजरा करणे फक्त स्वतःलाच आनंद देण्यासाठी आहे, तर तुम्हाला अपराधीपणाची भावना होऊ शकते.  तुम्ही फक्त आपल्या आनंदासाठी आणि त्यातून प्रसन्नता ओरबाडण्यासाठी कोणती पार्टी आयोजित करता आहात, तर तुम्हाला नक्कीच अपराधीपणाची भावना होईल. हे जास्त सयुक्तिक होईल, की तुम्ही असे  करू नका. हे तुम्ही आपल्या सभोवतालच्या मित्र, परिवार, प्रियजन, शेजारी यांना सुखी करण्यासाठी करत असाल, तर वेळ दवडू नका .या परिदृश्यात कोणताही उत्सव, मग तो व्हर्च्युअल असला तीर ती एक प्रकारची सेवा आहे. तुमचा उत्सव सेवा होऊन जाते, तेव्हा तुम्हाला कोणताही अपराध बोध होत नाही. सेवा तुमचा उत्सव झाल्यावर अभिमान गळून जातो.

म्हणून येत्या वर्षाचा उत्सव आम्ही  सर्वांमध्ये ज्ञान आणि  प्रसन्नतेचा संचार करण्याच्या उद्देशाने करू. वास्तविकता हीच आहे की,  सर्व अस्थायी आहे.  अनंत काय आहे? तर ती आत्मा आहे. आमची चेतना, जी बदलत नाही, तिचा जन्मही नाही आणि शेवट ही नाही.

विश्वाच्या चेतनेचे उन्नयन करणे ही २०२०च्या शेवटी व २०२१च्या प्रारंभापासूनच एक मोठी जबाबदारी आहे. नवीन रचनेचा प्रारंभ झाला आणि होत आहे. या ग्रहावर प्रत्येकासाठी एक नवी आशा निर्माण झाली आहे. माझा विश्‍वास आहे, की आमच्यापैकी  प्रत्येकात आपल्या सभोवती असलेल्या इतर लोकांचे उन्नयन करण्याची क्षमता आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com