कोल्ड ड्रिंक, विविध पदार्थात असणाऱ्या Artificial Sweetenes मुळे कॅन्सरचा धोका!

लोकं बाजारात मिळणारे रेडीमेड पदार्थ खाण्यावर अधिक भर देत आहेत
Artificial sweeteners in food-drink raise risk of cancers, artificial sweeteners side effects
Artificial sweeteners in food-drink raise risk of cancers, artificial sweeteners side effects

Artificial sweeteners in food-drink raise risk of cancers : आजकालच्या धावपळीच्या जगात लोकं खाण्यापिण्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतात. घरी अनेक पदार्थ करायला वेळ मिळत नसल्याने लोकं बाजारात मिळणारे रेडीमेड पदार्थ खाण्यावर अधिक भर देत आहेत. या गोष्टींची सवय आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. आपल्या दैनंदिन आहारात आपण अनेक प्रकारे आर्टिफिशिअल स्वीटनर (artificial sweetener) असलेले कोल्ड ड्रिंक्स, दही, चिज असे कित्येक पदार्थ खातो. पण अशा प्रकारच्या कृत्रिम गोड पदार्थांमुळे कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. (Artificial sweeteners side effects)

Artificial sweeteners in food-drink raise risk of cancers, artificial sweeteners side effects
गोऱ्या लोकांना कर्करोग होण्याचा धोका जास्त, अभ्यासात स्पष्ट

जे लोकं आर्टिफिशिअल स्वीटनर असलेल्या पदार्थांचे सेवन करतात त्यांच्यामध्ये कर्करोगाचा धोका सुमारे 13 टक्क्याने वाढतो. याबाबात डेली मेलमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले आहे. बर्‍याचदा कोल्ड्रिंक्सची चव वाढवण्यासाठी गोड पदार्थ मिक्स केले जातात, पण, यामुळे कर्करोगाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. फ्रेंच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थच्या तज्ज्ञांनी सुमारे 1 लाख लोकांवर हा अभ्यास केला आहे. या लोकांचे सरासरी वय 42 वर्षे होते, ज्यामध्ये एक तृतीयांश महिलांचा समावेश होता. या अभ्यासादरम्यान, 8 वर्ष तज्ञांनी 1 लाख लोकांच्या खाण्यापिण्याची तपासणी केली.

Artificial sweeteners in food-drink raise risk of cancers, artificial sweeteners side effects
शाकाहार कराल तर कॅन्सरपासून वाचाल! अभ्यास सांगतो...
Artificial sweeteners
Artificial sweeteners

अभ्यासात काय आढळले?

संशोधनात 37% लोकांना परिणाम माहिती असल्याने ते दिवसातून एकदा आर्टिफिशिअल स्वीटनर वापरतात, असे दिसून आले. याचा परिणाम असा झाला की अभ्यास संपेपप्यंत 3358 लोकांना कर्करोग झाला. या लोकांचे सरासरी वय 59 वर्षे होते. यामध्ये सर्वाधिक 22 टक्के म्हणजेच २०३२ लोकांना लठ्ठपणामुळे कर्करोग झाला. तर, 982 महिलांना स्तनाच्या कर्करोग झाला. 403 जणांना प्रोस्टेट कर्करोग झाला. एस्पारटेम (Aspartame) आणि एसउलफेम-के (acesulfame-K) मध्ये 200 पट जास्त गोडवा असतो. याविषयी कॅन्सर रिसर्च यूकेच्या वरिष्ठ आरोग्य माहिती व्यवस्थापक फिओना ओस्गन यांनी सांगितले की, आर्टिफिशिअल स्वीटनर आणि कर्करोग यांच्यात एक संबंध आहे. पण, याचा अर्थ असा नाही की ते यासाठी कारणीभूत आहेत. आपण जे खातो- पितो ते आपल्या आहारातील घटकापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. म्हणून फळे, भाज्या आणि कडधान्ये जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजे. तर, लाल आणि प्रक्रिया केलेले मांस (Red and processed meats, जास्त फॅट्स असलेले पदार्थ, साखर आणि मीठ कमी करणे गरजेचे आहे.

Artificial sweeteners in food-drink raise risk of cancers, artificial sweeteners side effects
लय भारी! इवलुशी मुंगी शोधणार कॅन्सरच्या पेशी

कोण घेते जास्त आर्टिफिशिअल स्वीटनर

लंडनच्या किंग्ज कॉलेज प्रोफेसर टॉम सँडर्स म्हणतात, की ज्या स्त्रिया लठ्ठ आहेत किंवा ज्या महिलांचे वजन वाढवण्याची प्रवृत्ती आहे, त्या आर्टिफिशिअल स्वीटनरचा अधिक वापर करतात. कारण सांख्यिकीय विश्लेषणामध्ये ते पूर्णपणे नियंत्रित करणे शक्य नाही. पण हा धोका रोजच्या चांगल्या दिनचर्येने कमी करता येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com