
हे कंदमूळ आहे. हे कच्च किंवा शिजवूनही खाल्लं जातं. जीवनसत्त्व आणि खनिजांचा यात भरपूर प्रमाणात साठा आहे.
पुणे : आपल्याकडे लाल रंगांचं बीटच प्रसिद्ध आहे. मात्र पिवळा, पांढरा आणि रेषारेषांच्या बीटचीदेखील लागवड होते. चवीला काहीसं गोड असतं. कंदमूळ असल्याने ते जमिनीत उगवतं. यात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, लोह, अ, बी ६ आणि क जीवनसत्त्व असतं. याचबरोबर फॉलिक अॅसिड, काबरेहायड्रेट्स, प्रथिन आणि फायबरचं प्रमाण अधिक असतं.
बीट हे कंदमूळ असल्याने ते पचायला कठीण असते. त्यामुळे तुम्ही सलाडमध्ये त्याचा वापर करताना हलकेच वाफवून घ्यावे. यामुळे बीट मऊ व पचायला हलके होते.
याच्या सेवनाने रक्ताभिसरण अतिशय उत्तम होतं.
१ अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण कमी होतं. धमन्यांचं आरोग्य सुधारतं. त्यामुळे हृदयरोगाचं प्रमाण कमी होतं. मधुमेह झालेल्या लोकांनीही बीटाचं सेवन करावं.
२ दररोज बिटाचा ज्युस प्यायल्याने मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्यामुळे वृद्धांमध्ये आढळून येणारा डिमेन्शिया काही प्रमाणात कमी होतो.
३ यात फायबरचं प्रमाण अधिक असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनीदेखील याचं सेवन करावं म्हणजे हा त्रास कमी होतो.
४ यात भरपूर प्रमाणात पोषणमूल्य असल्याने झोप येणे, स्नायूंची हालचाल, शिकणे किंवा लक्षात ठेवणे आदी गोष्टींसाठी अतिशय उपयुक्त आहे.
हेही वाचा : दुधाची पिशवी घरी आणताना करू नका 'ही' चूक, FSSAI ने दिला महत्त्वाचा सल्ला
५ संशोधकांच्या मते, दररोज 500 ग्रॅम बीटरूट खाल्ल्याने सहा तासांत ब्लड प्रेशर नियंत्रणात येण्यास मदत होते.
संपादन - सुस्मिता वडतिले