
उत्साह म्हणून जर तुम्ही कधी हाताच्या टाळ्या वाजवता तेव्हा तुम्ही नकळतपणे एक थेरपी करत असता . हे तुम्हाला माहित आहे का ?
देवीदेवतांची आरती करताना किंवा आनंदाच्या क्षणी तुम्ही आपसुकच टाळ्या वाजवता .पण तुम्हाला माहित आहे का ,अशा टाळ्या वाजवल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे होत असल्याचं समोर आलं आहे. म्हणून या प्रकाराला ‘क्लॅपिंग थेरपी’ असं म्हटलं जातं. ही थेरपी वापरण्यासाठी खूप सारे डॉक्टरांकडून सल्लाही देण्यात येतो.३४० प्रेशर पॉइंट्स हे मानवी शरीरात असतात. हाताच्या तळव्यामध्ये २७ प्रेशर पॉइंट्स आढळतात. त्या प्रेशर पॉइंटवर विशिष्ट दाब दिल्यास, मसाज केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. अनेक वेदना कमी होण्यास मदत होते.
क्लॅपिंग थेरपी अशी करा
» खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल हाताला लावून मसाज करा. ते हळूहळू त्वचेमध्ये शोषले जाते. दोन्ही हात एकमेकांवर ठेवा. ते डोळ्यांसमोर ताठपणे ठेवा. नंतर खांदे थोडे सैलसर ठेवा. सकाळच्या वेळी हा उपाय केल्यास अधिक उत्तम.
» जर तुम्हाला फीट आणि अॅक्टिव्ह राहायचे असेल तर सकाळी २०-३० मिनिटं टाळया वाजवाव्यात. टाळ्या वाजवल्याने रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होऊन रक्तप्रवाह सुधारतो. सोबतच कोलेस्ट्रेरॉलचा त्रासही कमी होतो असं म्हणतात.
हेही वाचा : गुंतागुंतीचा असा गंभीर डिस्टोनिया तुम्हाला माहित आहे का ?
कोणत्या ५ अॅक्युपंचर पॉइंटला टाळी वाजवल्याने चालना मिळते ?
» अंगठय़ाचं नख
» हँड वॅली पॉइंट
» मगनट
» इनर गेट पॉइंट
» अंगठय़ाच्या खालचा भाग
या पाच पॉइंट्सला चालना दिल्यास अनोखे फायदे होतात. ते पुढीलप्रमाणे –
१ हृदयाच्या आणि फुप्फुसांच्या कार्याला चालना मिळण्यासाठी, त्यासंबंधी वेदना कमी होण्यासाठी मदत होते.
२ पाठीचे, मानेचे आणि सांध्यांचे दुखणे देखील कमी होते.
३ मधुमेह, अथ्र्राईटीस, रक्तदाब, नराश्य, डोकेदुखी, निद्रानाश, केसगळती, डोळ्यांचे विकार यांसारख्या विविध समस्या कमी करण्यासाठी क्लॅपिंग थेरपी उपयुक्त ठरेल .
४ लो बीपीच्या रुग्णांना ही थेरपी फायदेशीर ठरते.
५ टाळ्या वाजवल्याने पोटाचे , पचनक्रियेचे आजार सुधारतात.
६ या थेरपीमुळे लहान मुलांची आकलनक्षमता सुधारते. सोबतच क्लॅपिंग थेरपीमुळे मुलांचा मेंदू तेज होण्यास मदत होते.
७ सतत एसीच्या रूममध्ये बसल्याने घाम येत नाही. या लोकांनी क्लॅपिंग थेरपी केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. तसेच शरीर शुद्ध होण्यास मदत होते.
८ क्लॅपिंग थेरपीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते तसेच अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते. सध्याच्या कोरोनाच्या काळात घरच्याघरी तुम्ही ही करू शकता.
९ यामुळे अस्थमाचा त्रासही कमी होतो.
१० जुने आजारही बरे होतात.