गुणकारी लवंग खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

भारतात लवंगचा वापर मसाला म्हणून प्रामुख्याने वापरण्यात येतो. पण याचे काही फायदेशीर गुणधर्म सुद्धा आहेत. लवंगचे फायदे काय?

मुंबई : आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण तसेच धावत्या जगात आज लोकं  स्वतःच्या जारांना दुर्लक्ष करत आहेत. छोटे आजार जेव्हा दुर्लक्ष केले जातात, काही काळानंतर मोठ्या रोगांचे कारण बनतात. आयुर्वेद नेहमी अशा आजारांना त्वरीत ठीक करण्याचे काम करतो. परंतु, आयुर्वेदाचा सध्या वापर कमी होत असल्याने, बहुतांश लोकांना याची माहिती नसते. मुख्य म्हणजेच आपल्या घरात उपलब्ध असलेल्या काही खाद्य पदार्थांचाच उपयोग अशा छोट्या आजारांवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. हळद, मिरी, ओवा, लवंग आदी विविध मसाल्यांचा वापर जरी आज जेवण चविष्ट बनविण्यासाठी होत असला, तरी याचा उपयोग विविध आजारांच्या उपचारासाठी केला जातो. भारतात लवंगचा वापर मसाला म्हणून प्रामुख्याने वापरण्यात येतो. पण याचे काही फायदेशीर गुणधर्म सुद्धा आहेत. 

Image may contain: plant and outdoor

(फोटो सोजन्य : गुगल )

लवंगचे फायदे काय?
१. दाताच्या दुखवण्यावर रामबाण उपाय
 दातांमध्ये होणाऱ्या तीव्र वेदनांना लवंग कमी करण्यात फायदेशीर ठरते. दातदुखीवरही लवंग अत्यंत परिणामकारक ठरते. जर तुम्ही दातदुखीने त्रस्त आहात तर एक कापसाचा बोळा घेऊन त्यावर लंवंगाचे तेल घ्या आणि दुखत असलेल्या दातावर लावा. लगेचच आराम मिळेल. आजकल टुथपेस्तमध्येही लवंग हा घटक असतो. लवंगमध्ये यूजेनॉल असते जे साइनस आणि दातांदुखी सारख्या हेल्थ प्रॉब्लम ठिक करण्यात मदत करते.

२. तोंडाची दुर्गंधी दूर करते
जर तुमच्या मुखातून दुर्गंध येत असेल तर लवंग यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. लवंगमध्ये यूजेनॉल असते जे साइनस आणि दातांदुखी सारख्या हेल्थ प्रॉब्लम ठिक करण्यात मदत करते. अनेकदा बोलताना तोंडातून दुर्गंध य़ेतो. दाताच्या काही समस्यांमुळेही दातांमधून वास येऊ शकतो. दाताखाली लवंग ठेवल्याने दुर्गंधी दूर होते शिवाय तुम्हाला फ्रेशही वाटते. 

३. मळमळ थांबण्यासाठी खा लवंग 
प्रवासात किंवा अपचन झाल्यावर मळमळ किंवा उलटीसारखे वाटते. मळमळ किंवा उलटी थांबविण्यासाठी सुद्धा लवंग उत्तम पर्याय आहे. लवंगामध्ये एंटीसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे मळमळ, उलटीसारखे वाटणे, यावर लवंग चघळणे फायदेशीर होतं.  गर्भारव्यस्थेत अनेक महिलांना सकाळी उठल्यावर उलटी, मळमळ जाणवते. यावर लवंगासारखा दुसरा पर्याय नाही. 

Image may contain: food

(फोटो सोजन्य : गुगल )

४. पचनक्रिया सुधारण्यास मदत
आजकाल कामाचे स्वरूप बदलले आहे यामुळे पचनाचा त्रास हा सर्व वयोगटातील लोकांना होतो. लवंग हा पोटदुखीवर तसेच पाचन सुस्थितीत आणण्यास फायदेशीर ठरते. लवंगातील गॅस्ट्रिक रसामुळे पचनक्रिया सुधारते. यासाठी २ लवंग किसून ते अर्धा कप पाण्यात घालून उकळवा. त्यानंतर पाणी थंड झाल्यावर ते प्या. असे रोज तीन वेळा केल्याने गॅसची समस्या दूर होण्यास मदत होईल. गॅस, जळजळीसारख्या समस्यांवर गुणकारी ठरेल.

5. 'या' दुखण्यांसाठी वापरा लवंग 
डोकेदुखी, टाचांमध्ये उत्पन्न होणाऱ्या वेदनांना कमी करण्यास, तसेच शरीराची प्रतिरोधक क्षमता वाढवण्याचे काम लवंग करते. त्याचं तेल लावल्याने किंवा लवंगीच्या वासाने दुखणे कमी होण्यास मदत होते. बऱ्याचदा वयस्कर व्यक्तिंना सांधेदुखीचा त्रासाला सामोरे जावे लागते. लवंगाचे तेले साध्यांवर लावल्याने सांधेदुखीचा त्रासही कमी होतो.

6. सायनस सारख्या समस्येवर उपाय
मायग्रेन, सर्दी, कानातील इन्फेकशनसाठी लवंगच्या तेलाचा वापर करण्यात यावा. सायनसपासून सुटका मिळवण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर ठरते. सायनस असणाऱ्यांनी रोज ३-४ चमचे लवंगाचे तेल पाण्यात घालून घेऊ शकता. त्यामुळे इंफेक्‍शन दूर होईल आणि श्वास घेताना होणार त्रास कमी होईल. लवंगच्या वासाने ताण दूर होतो. तुम्ही तणावात असाल तर तुमच्या अंघोळीच्या पाण्यात लवंग टाका अंघोळीनंतर तुम्हाला रिलॅक्स वाटेल. 

Image may contain: food

(फोटो सोजन्य : गुगल )

7. चेहऱ्याच्या समस्या होतील दूर 
चेहऱ्यावर मुरमं (पिंपल्स) येत असतील तर, लवंग खाल्ल्याने मुरमं येणं बंद होतील.लवंगात असलेल्या अँटी ऑक्‍सीडेंटमुळे त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढीस लागते. लवंगाच्या तेलात अॅँटी मायक्रोबियल असे  गुणधर्म असतात. पिंपल्सपासून सुटका मिळण्यास याचा फायदा होतो. पिंपल्स चेहऱ्यावर वाढतही नाहीत. चेहऱ्यावरील डाग दूर होतात. लवंगाचा लेप देखील तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.

Image may contain: food

(फोटो सोजन्य : गुगल )

लवंगमुळे नुकसान काय?
1.लवंगच्या अति सेवनामुळे रक्तातील साखर कमी  होण्याचा धोका असतो.
2. रक्तातील साखर कमी झाल्याने अशक्तपणा जाणवू शकतो. 
3. रक्तस्त्राव जास्त होण्याची शक्यता असते.
4. काहींना लवंग खाल्याने अॅलर्जीचा त्रास होतो.
5. जास्त लवंग खाल्याने शरीरात विषारी तत्व साठू शकतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: benefits of clove information in marathi language