esakal | ताडगोळ्यांची बातच न्यारी! ८ शारीरिक तक्रारींवर आहे गुणकारी
sakal

बोलून बातमी शोधा

ताडगोळ्यांची बातच न्यारी! ८ शारीरिक तक्रारींवर आहे गुणकारी

ताडगोळ्यांची बातच न्यारी! ८ शारीरिक तक्रारींवर आहे गुणकारी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

उन्हाळा (summer) हा अनेकांच्या नावडतीचा ऋतू. मात्र, याच ऋतूमध्ये अनेक फळांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. जांभूळ, कैऱ्या, आंबे, फणस, करवंद आणि असे असंख्य फळं या दिवसांमध्ये बाजारात सहज मिळतात. आणि हो, या दिवसांमध्ये येणारे ताडगोळे (ice apple) कसे काय विसरता येतील? पाणीदार, मऊ, पांढरे शुभ्र ताडगोळे अनेकांचं मन मोहून टाकतात. ‘ताल’, ‘ताती मुंजलू’, ‘नुग्नू’, ‘आईस ऍपल’, तारी अशा असंख्य नावाने हे ताडगोळे वेगवेगळ्या प्रांतात ओळखले जातात. खासकरुन उन्हाळ्यात दिसणाऱ्या या फळाला प्रचंड मागणी असते. चवीप्रमाणेच हे फळ त्याच्यातील गुणधर्मांमुळेही लोकप्रिय आहे. ताडगोळ्यांमध्ये खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी हे जीवनसत्त्व आढळतात. म्हणूनच आज ताडगोळ्यांचे गुणकारी फायदे (benefits) कोणते ते पाहुयात. (benefits ice apple summer health healthy life)

हेही वाचा: कांदा आणि सैंधव मीठामुळे कोरोना होतो बरा?

ताडगोळे खाण्याचे फायदे

१. उन्हाळ्यात अनेकांना उष्णतेचे विकार होतात. त्यावेळी ताडगोळ्यांचं सेवन करावं. त्रास कमी होतो.

२. शरीरातील पाण्याची कमतरता ताडगोळ्यांमुळे भरुन निघते.

३. शरीराचे तापमान नियंत्रणात राहते.

४. त्वचाविकार कमी होतात.

५. उन्हाळ्यात शरीराची होणारी दाह कमी होते.

६. उन्हात जाऊन आल्यानंतर जर चेहऱ्याची जळजळ होत असेल तर ताडगोळ्याचं पाणी व ताडगोळा चेहऱ्यावर लावावा. त्यानंतर गार पाण्याने चेहरा पुसून घ्यावा.

७. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

८. वजन नियंत्रणात राहतं.