आई झालेल्या प्रत्येक स्त्रीला माहिती असायला हव्या अशा 'पाच' स्तनपानाच्या स्थिती

best breast feeding positing for healthy baby nagpur news
best breast feeding positing for healthy baby nagpur news

नागपूर : आई बनणे हे विश्वातील सर्वात मोठे सुख आहे, असे म्हटले जाते. मात्र, मातृत्वाचा अनुभव घेताना अनेत जबादारींचं ओझ देखील वाढत जाते. या काळात मुलाच्या आरोग्यावर लक्ष देणे गरजेचे असते. त्यामध्ये स्तनपान देखील महत्वाची भूमिका बजावते. स्तनपान करताना आई अन् मुलाची स्थिती काय असायला पाहिजे, याबाबत मातेला पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. यामुळेच बाळाची वाढ होते आणि बाळ सुदृढ बनण्यास मदत होते. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला काही स्तनपानाच्या स्थिती सांगणार आहोत. 

क्रॉसओव्हर होल्ड -
या स्थितीमध्ये तुम्हाला छातीच्या दुसऱ्या बाजुला असलेल्या हाताचा वापर करणे गरजेचे आहे. अर्थातच तुम्ही डाव्या स्तनानी बाळा दूध पाजत असाल तर उजव्या हाताचा वापर करावा. त्यानंतर पाय देखील मोडीत घालून बाळाला मांडीत ठेवा. खाली वाहून बाळाच्या तोंडात निपल देण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बाळाने तोंडात निपल पकडले की त्याच स्थितीमध्ये दूध पाजा.

रिक्लाइंड पोझिशन -
या स्थितीमध्ये बाळाला पोटावर ठेवा. त्यानंतर बाळाच्या डोक्याजवळील हाताला त्याच्या पाठीवर ठेवा. या स्थितीमध्ये स्तनपान करताना निपल सहजपणे बाळाच्या तोंडामध्ये येईल.

क्रेडल होल्ड ब्रेस्टफीडींग पोझिशन -
ही एक सर्वसाधारण पोझिशन असून ज्याचा वापर अनेक महिला करत असतात. या स्थितीमध्ये बाळाच्या पाठीला आपल्या हातांच्या सहारा द्यावा. बाळावा छातीसमोर पकडून निपल त्याच्या तोंडात जाईल अशा आरामदायी स्थितीमध्ये त्याला स्तनपान करावे.

साइड लाइंग पोझिशन -
आई आणि बाळ दोन्ही ज्यावेळी बेडवर झोपलेले असते, त्यावेळी या स्थितीमध्ये स्तनपान केले जाते. सर्वात चांगल्या स्थितीपैकी एक आहे. मात्र, अनेक बाळांना ही स्थिती आवडत नाही. या स्थितीमध्ये निपल बाळाच्या तोंडात आहे की नाही याबाबत खात्री करावी. आपल्या हाताचा वापर करत निपल बाहेर आणून बाळाच्या तोंडात टाका. तसेच तुमच्याजवळ अतिरिक्त ओढण्यासाठी काही असेल ते बाजूला करा, जेणेकरून बाळाला गुदमरायला होणार नाही. 

फुटबॉल होल्ड -
एका हाताने बाळाला पकडा आणि त्याला जवळ ओढा. एक हात डोक्याखाली ठेवा आणि दुसऱ्या हातानी त्याला व्यवस्थित पकडून स्तनपान करा.  

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com