चेहऱ्याचा ग्लो वाढवायचा असेल तर झोपण्यापुर्वी करा या गोष्टी

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 28 October 2020

 बऱ्याचदा पुरेशी झोप घेतल्यानंतरही तुमचा चेहरा सकाळी थकलेला आणि उतरलेला दिसतो. जर तुम्हाला तुमचा चेहऱ्यावर नेहमी नॅचरल ग्लो हवा असेल तर तुम्ही यासाठी पुढील ट्रीक ट्राय केल्या पाहिजेत.

पुणे: बऱ्याचदा पुरेशी झोप घेतल्यानंतरही तुमचा चेहरा सकाळी थकलेला आणि उतरलेला दिसतो. जर तुम्हाला तुमचा चेहऱ्यावर नेहमी नॅचरल ग्लो हवा असेल तर तुम्ही यासाठी पुढील ट्रीक ट्राय केल्या पाहिजेत.

1. रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी 1 ग्लास पाणी प्या.

2. आहारात गाजरांचा समावेश करा. यामध्ये व्हीटॅमिन K, C, E, A आणि B चे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे त्वचेवरील मृत पेशी नष्ट होण्यास मदत होते. 

Honey Face Packs for Normal Skin | Dabur Honey

वजन कमी करायचंय? वाचा कधी जॉगिंग करणं ठरेल फायदेशीर

3. आपण बऱ्याचदा झोप व्यवस्थित घेत नाही त्याचा फटका आपल्या त्वचेला बसू शकतो. त्यासाठी पूरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. त्वचेला ग्लो येण्यासाठी ती महत्त्वाची भूमिका बजावते.

Is Sleeping In on Weekends Good for Your Health? | American Heart  Association

दुध आपल्या शरीरासाठी पोषक असते. तसेच त्यात असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचा निरोगी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्ही त्याचा फेस पॅक म्हणून वापर करू शकता. कच्च्या दूधात मध मिसळून तुम्ही त्याचा फेस पॅक करू शकता. तसेच तो फेस पॅक 10 ते 15 मिनिटे लावून ठेवला पाहिजे.

पोट सारखं बिघडतंय? पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी लक्षात ठेवा 4 गोष्टी

जर तुम्हाला तुमचे ओठ मुलायम आणि सुंदर दिसणे अपेक्षित असेल तर तुम्ही त्यासाठी रात्री झोपताना टुथब्रशने ओठांवरील डेड स्कीन रगडून स्वच्छ केली पाहिजे. त्यानंतर ओठांवर बदामाचे तेल किंवा मध लावून झोपले पाहिजे. 

( हा मजकूर फक्त सल्ल्यासह सर्वसाधारण माहिती प्रदान करतो. ही मते पात्र वैद्यकीय मतांना पर्यायच असतील असे नाही) 

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for better glow tips which should do before sleeping

Tags
टॉपिकस
Topic Tags: