कोरोना लॉकडाउनचा दृष्टीवर परिणाम; लहान मुलांमध्ये Myopia चा धोका

कोरोना लॉकडाउनचा दृष्टीवर परिणाम; लहान मुलांमध्ये Myopia चा धोका
Summary

लॉकडाऊनच्या काळात सर्वांच्याच स्क्रीन टाइममध्ये मोठी वाढ झाली. विशेषत: लहान मुलं स्क्रीनसमोर जास्त वेळ बसत आहेत.

तु्म्हाला वाचन करताना किंवा स्क्रीन पाहताना डोळ्यांना त्रास जाणवतो का? गेल्या वर्षभरात डोळ्यांवर ताण येत असल्यासारखं वाटतं का? लॉकडाऊनच्या काळात सर्वांच्याच स्क्रीन टाइममध्ये मोठी वाढ झाली. विशेषत: लहान मुलं स्क्रीनसमोर जास्त वेळ बसत आहेत. याचा परिणाम मुलांच्या डोळ्यांवर होत असून निकट दृष्टीदोषाचा त्रास त्यांच्यात दिसून येत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन केल्यानंतर वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शाळा यामुळे बंदीस्त खोलीत तासन् तास स्क्रीन समोर जाऊ लागला. याचा परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावरही होत असल्याचं आता समोर आलं आहे.

निकट दृष्टीदोष म्हणजेच मायोपियाची लक्षणे लहान मुलांमध्ये जास्त दिसत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. नेदरलँड आणि चीनमध्ये याबाबत संशोधन झालं आहे. त्यात कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंध आणि त्यानंतर मायोपियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. 1 लाख 20 हजार शाळेच्या विद्यार्थ्यांचा यासाठी अभ्यास करण्यात आला. यामध्ये सहा ते आठ वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. अभ्यासातून असी माहिती समोर आली आहे की, आधीच्या तुलनेत 2020 मध्ये तीन पट जास्त मायोपियाचे प्रमाण आढळले.

कोरोना लॉकडाउनचा दृष्टीवर परिणाम; लहान मुलांमध्ये Myopia चा धोका
प्लेटलेट्स कमी होणं कोरोना नवं लक्षण?

लहान मुलांमध्ये निकट दृष्टीदोष दिसत असून त्यात दूरचं अंधुक दिसण्याचा दोष आहे. निकट दृष्टीदोषाचा त्रास हा प्रायमऱी स्कूलमध्ये साधारणत: दिसू लागतो. त्यानतंर मुलं मोठी होतात तशी त्यात वाढ होत जाते. जितक्या लवकर याला सुरुवात होते तेवढाच तो जास्त वाढतो. एकदा डोळ्यांच्या आकारात बदल झाला तर तो पुन्हा पुर्ववत होत नाही. डोळ्यांच्या बुबुळांचा आकार जर सहा ते दहा वर्षे वयापर्यंत वाढला तर त्यामुळे दूरचं दिसण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. यामुळे डोळ्यांवर ताण वाढण्याचा धोका असतो. परिणामी भविष्यात पूर्ण दृष्टी जाण्याचीही शक्यता असते.

ब्रायन व्हिजन इन्स्टिट्यूटच्या मते, 2050 पर्यंत जगातील निम्म्या लोकसंख्येला मायोपिया होऊ शकतो. त्यातही औद्योगिकीकरण झालेल्या देशांमध्ये गेल्या काही दशकात याचे प्रमाण वाढले आहे. शैक्षणिक संधी आणि दृष्टी दोषाच्या परस्परसंबंधात वाढ झाल्याचंही म्हटलं आहे. जितकं शिक्षणाची पातळी उंचावली तितकंच मायोपियाचं प्रमाणही वाढल्याचा दावा यामध्ये कऱण्यात आला आहे. पीसी, स्मार्टफोन, टॅब्लेट्स यांचा वाढता वापर आणि घराबाहेर जाण्याचा कमी झालेला वेळ याचाही मायोपिया होण्यामध्ये मोठा वाटा आहे असं निकोल एटर यांनी म्हटलं आहे.

कोरोना लॉकडाउनचा दृष्टीवर परिणाम; लहान मुलांमध्ये Myopia चा धोका
मायग्रेनपासून सुटका हवीये? लाइफस्टाईलमध्ये करा हे बदल

आशियाई देसांमध्ये निकट दृष्टीदोष असलेल्या मुलांचे वय सरासरीपेक्षा जास्त आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर हाँगकाँग, तैवान, दक्षिण कोरियात 20 वर्षे वयोगटात 20 ते 30 टक्के लोकांमध्ये निकट दृष्टी दोष आढळला. आज हेच प्रमाण तब्बल 80 टक्क्यांवर आहे. चीनमध्ये पाच पैकी चार लोकांमध्ये हा त्रास आहे. तर आशियाई देशांमध्ये त्याचं प्रमाण जास्त असून जवळपास ते 95 टक्के इतकं आहे. युरोपातसुद्धा पौगंडावस्थेतील तरुणांमध्ये अर्ध्या तरुणांना याचा त्रास आहे.

जवळच्या वस्तुकडे बराच काळ एकटक न पाहिल्यास मायोपियाचा धोका कमी हऊ शकतो. विशेषत: स्मार्टफोन, पुस्तके यामध्ये जास्त काळ जात असेल तर डोळ्यांवर परिणाम होतो. यामध्ये डोळे आणि संबंधित वस्तू यांच्यात किती अंतर असतं हे महत्त्वाचं ठरतं. घराबाहेर जास्त काळ घालवल्यानं मायोपियाचा धोका कमी होऊ शकोत. बंद खोलीमध्ये प्रकाश कमी असतो. उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळा किंवा हिवाळ्यात मायोपिया वाढू शकतो. कारण या काळात सुर्य प्रकाश कमी असतो.

कोरोना लॉकडाउनचा दृष्टीवर परिणाम; लहान मुलांमध्ये Myopia चा धोका
देशावर आता ग्रीन फंगसचं सावट; 'ही' आहेत लक्षणे, कारणे

इलेक्ट्रिक उपकरणांचा वाढता वापर हा फक्त निकट दृष्टीदोषाला कारणीभूत ठरतो असं नाही. तर याशिवाय डोळे कोरडे पडण्याची शक्यता असते. सतत स्क्रीनकडे पाहिल्यानं स्पष्ट न दिसता दृश्य अंधूक दिसू लागते. सांयकाळी किंवा रात्री स्मार्टफोनचा वापरल्यानं निद्रानाशाचा त्रासही होऊ शकतो. ब्लू लाइट स्क्रीन पाहण्याच्या सवयीचा परिणाम झोप लागण्यासाठी आवश्यक असलेल्या मेलाटोनिन हार्मोनवर होतो. झोपण्याआधी किमान दोन तास तरी अशा स्क्रीनपासून दुर रहायला हवं असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

लहान मुलं सतत मोबाईल घेऊन बसतात. पण पालकांनी त्यांच्या मुलांना मर्यादीत वेळच ही उपकरणे हाताळू दिली पाहिजेत. तीन वर्षे वयापर्यंत पीसी, स्मार्टफोन आणि टॅब्लेट हे मुलांनी वापरणं त्यांच्यासाठी घातक असल्याचं मत बेट्टिना वॅबल्स यांनी व्यक्त केलं आहे. तसंच चार ते सहा वर्षांच्या मुलांनी जास्ती जास्त तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाइल किंवा पीसी समोर बसू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. फक्त लहान मुलंच नाही तर प्रौढांनीसुद्धा डोळ्यांची काळजी घ्यायला हवी असं बेट्टिना म्हणतात. स्क्रीनवर सतत काम असेल तर ठराविक वेळाने ब्रेक घेणं आणि शक्य तितका वेळ बाहेर मोकळ्या वातावरणात घालवला पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com