esakal | Daily योग: अर्ध हलासनाचे फायदे कोणते?
sakal

बोलून बातमी शोधा

ardha halasan

Daily योग: अर्ध हलासनाचे फायदे कोणते?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

'अर्ध हलासन' करताना आपले शरीर हे अर्ध्या नांगराप्रमाणे दिसते. उच्चरक्तदाब, बद्धकोष्ठता यांसारखे आजार असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य प्रकारे हे आसन नियमित केल्यास त्याचा शरीराला फायदा होतो.

अर्ध हलासन कसे करावे?

- पाय जमिनीला टेकवून हात आणि पाय जमिनीवर सरळ रेषेत राहतील अशा स्थितीत पाठीवर झोपा.

- दोन्ही पाय एकमेकांना जुळवून गुडघ्यांत न वाकवता हळूहळू वर नेत ३० अंशाच्या कोनात आणा.

- काही क्षणांनंतर दोन्ही पाय ६० अंशाच्या कोनात आणा.

- पाय हळूहळू आणखी वर नेत काटकोनात आणा.

- ही आसनाची अंतिम स्थिती असेल. अर्ध हलासन करताना कमरेपासून खांद्यांपर्यंतचा भाग सरळ असणे आवश्यक आहे.

- अंतिम स्थितीत सहज शक्य असेल तेवढा वेळ राहा. त्यानंतर हळूहळू पाय पुन्हा जमिनीवर सरळ रेषेत आणा.

हेही वाचा: Daily योग: जाणून घ्या, दंडासनाचे फायदे

अर्ध हलासनाचे फायदे-

- व्हेरिकोज वेन्सचा (varicose veins) आजार असलेल्यांनी हे आसन केल्यास फायदेशीर ठरेल.

- या आसनामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

- पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते.

- ओटीपोटातील स्नायू, मांड्या आणि पायांचे स्नायू बळकट करते.

- रक्ताभिसरण सुधारण्यासाठी हे आसन फायदेशीर आहे.

loading image