esakal | Daily योग: पाठदुखीसाठी करा तिर्यक भुजंगासन
sakal

बोलून बातमी शोधा

tiryak bhujangasan

Daily योग: पाठदुखीसाठी करा तिर्यक भुजंगासन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

संस्कृत भाषेत सापाला भुजंग असं म्हणतात. हे आसन करताना शरीराचा वरचा भाग हातांच्या सहाय्याने उचलला जातो. उचललेला शरीराचा वरील भाग हा सापाच्या फण्यासारखा दिसतो. म्हणून याला भुजंगासन म्हणतात. 'तिर्यक भुजंगासन' हा भुजंगासनाचाच एक प्रकार आहे.

तिर्यक भुजंगासन कसे करावे?

प्रथम जमिनीवर पालथे झोपून पाय सरळ रेषेत ठेवावे. यावेळी दोन्ही पायाची पावले व टाचा एकमेकांना स्पर्श करतील याची खात्री करावी. त्यानंतर हाताचे तळवे जमिनीवर ठेवून खांद्याखाली घ्यावे. हाताचे कोपरे शरीराला लागून समांतर असावेत. एक दीर्घ श्वास घेऊन हळूहळू डोके, छाती, पोट उचलावं. आता हातांचा आधार घेत तुमचे शरीर जमिनीपासून वर उचला. आता श्वास घेत उजव्या बाजूला फिरून श्वास सोडत डाव्या पायाच्या पंज्याला बघण्याचा प्रयत्न करावा आणि डाव्या बाजूला फिरून श्वास सोडत उजव्या पायाच्या पंज्याला बघण्याचा प्रयत्न करावा.

तिर्यक भुजंगासनाचे फायदे कोणते?

- पाठिच्या कण्याची लवचिकता वाढते.

- पाठदुखीची समस्या दूर होते.

- बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

- पोटाचे विकार दूर होतात.

- ओटीपोटातील स्नायू मोकळे होतात.

loading image