White Salt vs Pink Salt: आयोडीन असलेलं शुद्ध मीठ चांगलं की डोंगरातून खणलेलं सेंधवा? | difference between white salt rock salt advantages disadvantages both | Sendha namak fayade | sendha namak benefits | Rock Salt Benefits | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

White Salt vs Pink Salt

White Salt vs Pink Salt: आयोडीन असलेलं शुद्ध मीठ चांगलं की डोंगरातून खणलेलं सेंधवा?

Rock Salt Vs Regular Salt: D Mart ला गेल्यावर आपण मिठाच्या सेक्शन मध्ये अनेकदा दोन प्रकारचे मीठ बघतो. एक ज्याचा रंग हा पांढरा असतो आणि दुसऱ्याचा जरासा गुलाबी (rock salt) असतो. हे गुलाबी मीठ म्हणजेच सेंद्रिय किंवा सेंधवा मीठ.

आपण अनेकदा जे स्वस्त ते उचलून घरी घेऊन येतो. पांढरे मीठ हे स्वस्त असते तर सेंधवा मीठ हे महाग असते. रोजच्या जेवणात आपण पांढरे मीठ वापरावे की सेंधवा याबबात लोकांमध्ये मोठे गैरसमज आहेत.

काहींचे म्हणणे आहे की सेंधवा मीठ आरोग्यासाठी चांगले आहे, तर काहींचे म्हणणे आहे की पांढर्‍या मिठात आयोडीन असल्यामुळे ते चांगले आहे.

पांढऱ्या मीठाचा वापर मुख्यतः स्वयंपाकासाठी केला जातो. पण, काही लोक स्वयंपाकासाठी सेंधवा मीठ देखील वापरतात. पांढरे आणि रॉक मीठ दोन्हीचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. चला जाणून घेऊया...

पांढऱ्या मीठाचे फायदे

1. पांढरे मीठ जवळपास सर्वत्र उपलब्ध आहे. हे सर्वात सामान्य मीठ आहे, जे जगभरात सर्वाधिक वापरले जाते.

2. त्यात आयोडीन मिसळलेले असल्याने पांढरे मीठ खाण्याचाही सल्ला दिला जातो.

3. आयोडीन हे अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे. थायरॉईड (thyroid) कार्य आणि मेंदूच्या विकासासाठी आयोडीन विशेषतः महत्वाचे आहे.

4. आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉईडचा विकार होऊ शकतो.

5. आयोडीनयुक्त मीठ खाल्ल्याने आपली रोजची आयोडीनची गरज पूर्ण होऊ शकते.

पांढरे मीठ जास्त का वापरले जाते

पांढरे मीठ सगळ्यांच्याच घरामध्ये वापरले जाते शिवाय ते बहुतेक ठिकाणी उपलब्ध सुद्धा असते याचे एक मोठे कारण म्हणजे ते खूप स्वस्त आहे. हे मीठ कोणत्याही किराणा दुकानात किंवा ऑनलाइन स्टोअरमध्ये 12-15 रुपये प्रति किलो इतक्या कमी किमतीत सहज उपलब्ध आहे.

मुख्यतः पांढरे मीठ स्वयंपाकासाठी वापरले जाते. बहुतेक पदार्थ फक्त पांढऱ्या मीठानुसार तयार केले जातात. त्याची बारीक पोत आणि सहज विरघळणारे गुणधर्म वापरण्यास सुलभ करतात. अनेक प्रकारच्या अन्नामध्ये पांढरे मीठ वरुन सुद्धा वापरले जाते.

पांढर्‍या मीठाला शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जावे लागते. या प्रक्रियेमध्ये ब्लीचिंग तसेच अँटी-केकिंग इंग्रेडिअन्ट समाविष्ट होतात. यामुळे पांढरे मीठ नैसर्गिक राहत नाही. पांढऱ्या मिठात सोडियमचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असते.

जास्त प्रमाणात सोडियमचे सेवन आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. हे विशेषतः हृदयाचे आरोग्य, हाय बीपी आणि किडनीच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते.

सेंधवा मिठाचे फायदे

रॉक साॅल्ट किंवा सेंधवा मीठ याला आपल्या देशात उपवासाचे मीठ देखील म्हटले जाते. हे तसे जरासे जाड मीठ असते, ज्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखी खनिजे आढळतात. ही खनिजे आरोग्यासाठी चांगली असतात.

पण, या मिठात आढळणारी ही खनिजे फारच कमी प्रमाणात असतात, त्यामुळे ते फारसे आरोग्यदायी फायदे देत नाहीत. पांढऱ्या मीठाप्रमाणेच त्याचा वापर केल्यास ते खाण्यासही कमी लागते, त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

सेंधवा मीठ म्हणजेच रॉक साॅल्टवर फार कमी प्रक्रिया केली जाते. पांढऱ्या मिठाप्रमाणे त्याला अनेक प्रक्रियेतून जावे लागत नाही.

डोंगरातून रॉक साॅल्ट काढले जाते आणि नंतर काही गोष्टी मिसळल्यानंतर ते तुमच्या घरापर्यंत पोहोचवले जाते. यामुळेच काही लोकांना सेंधवा मीठ आवडते आणि ते सेवन करतात.

रॉक सॉल्टची स्वतःची चव आणि गुलाबी रंग आहे. रॉक मीठ तुमच्या अन्नाला किंवा सॅलडला एक वेगळी चव देते. बर्‍याच वेळा सॅलड वगैरे सजवण्यासाठी त्याचा वापर केला जातो आणि त्याचा अनोखा रंग आणि सुगंध सॅलडला वेगळी चव आणि रंग देतो.