
मनुके खाण्याचे अनेक फायदे आहेत.
नवी दिल्ली- मनुके खाण्याचे अनेक फायदे आहेत. मनुक्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, विटॅमीन बी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर इत्यादी आढळते. अनेकजण थंडीच्या दिवसात मनुके खाण्याचे प्रमाण वाढवतात. यामुळे शरीर गरम राहण्यास मदत होते. मनुके खाल्याने तुम्ही अॅनीमियापासून वाचू शकता. पण, अधिक प्रमाणात मनुके खाल्ल्यास नुकसानही होऊ शकतं. जाणून घ्या मनुके जास्त प्रमाणात खाण्याचे नुकसान...
वजन वाढणे
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर चुकुनही मनुके खाऊ नका. मनुके खाल्ल्याने वजन वाढते. मनुक्यात फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते. याचे सेवन केल्यामुळे तुमचे वजन केव्हा वाढले हे कळणार सुद्धा नाही.
कॅल्शियमच्या कमतरतेचे हे आहेत भयानक परिणाम; जाणून घ्या काय आहेत लक्षणे
उलटी आणि डायरिया
जास्त मनुके खाल्याने उलटी आणि डायरियाची समस्या होऊ शकते. पचनसंस्था ठीक नसल्यास चुकुनही मनुके खाऊ नका. पोट मनुक्यांना योग्यपणे पचवू शकत नाही. त्यामुळे उलटी आणि डायरियाची समस्या जाणवू शकते.
हृदय रोग
ज्यांना हृदयासंबंधी आजार आहेत, त्यांनी मनुके खाऊ नये. तसेच ज्यांचे वजन जास्त आहे, अशांना हृद्यासंबंधी आजार होऊ शकतात. मनुक्यात मोठ्या प्रमाणात ट्रायग्लिसराइड्स असते, आरोग्यसाठी ते चांगले नसते.
अॅलर्जी
मनुके जास्त खाल्याने त्वचा खाजणे, रॅशेज इत्यादी समस्या जाणवू शकते. मनुके खाल्ल्याने त्वचा खाजत असेल तर अधिक खाऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यानंतर तुम्ही त्याचे सेवन करु शकता.