Diwali 2020: दिवाळीमध्ये फिट राहण्यासाठी 5 टीप्स

diwali.
diwali.

नवी दिल्ली- दिवाळीचा उत्सव सुरु झाला आहे. हिंदू धर्मामध्ये दिवाळी सणाला महत्वाचे स्थान आहे. या काळात लोक आपल्या घरी दिवे लावतात. शिवाय घरी अनेक प्रकारचे पदार्थ केले जातात. दुसऱ्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. त्यामुळे डायबिटीज असलेल्या रुग्णांना विशेष काळजी घ्यावी लागते. अधीक गोड खाणे डायबेटीजच्या रुग्णांना धोक्याचे ठरु शकते. याच पार्श्वभूमीवर डायबेटिजच्या रुग्णांसाठी काही टिप्स...

दिवसभरात थोड-थोडे खा

दिवसभरात केवळ तीन-चार वेळा थोडे-थोडे खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या शरीरातील शूगरची लेवल नियंत्रणात राहिल आणि डायबेटिजची समस्या जाणवणार नाही. 

स्नॅक्स किंवा नट्स खा

दिवाळीच्या दिवसात काही गोड खाण्याऐवजी तुम्ही स्नॅक्स खाऊ शकता. उत्सवात गोड खाणे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम टाकू शकते. 

दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या. त्यामुळे तुम्ही निरोगी रहाल. उत्सवात लोक सामान्य दिवसापेक्षा जास्त खातात. या अन्नाला पचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी पिण्याची आवश्यकता असते. 

डार्क चॉकलेट खा

सणादिवशी लोक विविध प्रकारचे गिफ्ट देत असतात. काही लोक स्वीट्ससोबत चॉकलेटही देऊ लागलेत. अशावेळी तुम्ही चॉकलेट खात असाल तर मिल्क चॉकलेट ऐवजी डार्क चॉकलेट खा. डार्क चॉकलेटमध्ये मिल्क चॉकलेटपेक्षा कमी शूगर असते. 

बेकरी प्रोडक्टस खाऊ नका

बेकरी प्रोडक्ट्स जसं की बिस्किट आणि केकचे सेवन चुकूनही करु नका. बेकरी प्रोडक्टच्या सेवनामुळे शूगरची लेवल वाढण्याचा धोका असतो. उत्सवाच्या दिवशी निरोगी राहायचं असेल तर डीप-ड्राय फूड्स जसे की समोसे, भजे खाऊ नका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com