
अन्नाच्या बाबतीत काही गोष्टी कटाक्षाने पाळणे आवश्यक असते. काही गोष्टीसोबत मुळा खाणे हे अत्यंत घातक ठरू शकते. आपण सलाडमध्ये मुळा खात असाल किंवा मुळ्याचे पराठे आपल्याला आवडत असतील तर काही गोष्टी त्याच्यासोबत खाणे टाळावे. मुळा हा थंड पदार्थ आहे. त्याच्यासोबत गरम पदार्थांचे सेवन केल्याने शरीरासाठी घातक ठरू शकते.
पुणे : अन्नाच्या बाबतीत काही गोष्टी कटाक्षाने पाळणे आवश्यक असते. काही गोष्टीसोबत मुळा खाणे हे अत्यंत घातक ठरू शकते. आपण सलाडमध्ये मुळा खात असाल किंवा मुळ्याचे पराठे आपल्याला आवडत असतील तर काही गोष्टी त्याच्यासोबत खाणे टाळावे. मुळा हा थंड पदार्थ आहे. त्याच्यासोबत गरम पदार्थांचे सेवन केल्याने शरीरासाठी घातक ठरू शकते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दूध : मूळ्यासोबत किंवा मूळ्याचे पदार्थ खाल्यानंर दूधापासून बनविलेल्या वस्तू खाणे टाळावे. दूधामध्ये गरमी असते आणि मुळ्याची प्रकृती ही थंड असते. यामुळे थंड आणि गरम एकत्र आल्याने शरीरातील ताळमेळ बिघडू शकतो. यामुळे त्वचेचे आजार जडू शकतात. मूळ्यापासून बनवलेले पदार्थ खाल्यानंतर किमान तीन तास तरी दूधापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावेत.
खजूर खाल्याने या आजारांना दूर ठेऊ शकता तुम्ही
काकडी : सलाडच्या स्वरुपात आपल्याला काकडी खाने पसंद असेल तर मुळा आणि काकडी सोबत खाऊ नये. काकडी आणि मुळ्याचे एकत्रित सेवन करणे हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. काकडीमध्ये एस्कॉर्बिनाज असते ज्यामुळे विटॅमिन सीला कमी करते. त्यामुळे मुळ्यासोबत काकडी खाल्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.
निरोगी आयुष्यासाठी या आहेत महत्वाच्या दहा टिप्स
संत्री : मूळ्यासोबत कधीही आंबट फळाचे सेवन करु नका. संत्री आणि मोसंबी खाने हे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते. मुळ्यापासून बनवलेले पदार्थ खाल्यानंतर लिंबू खाणेही शरीरासाठी घातक ठरू शकते. यामुळे पोटात खराब होऊ शकते किंवा पोटात दुखुही शकते.
झोपण्यापूर्वी लवंग नक्की खा; पुरुषांसाठी 'हे' आहेत फायदे
कारले : आपल्याला वाटत असेल की कारले खाणे हे शरीरासाठी अत्यंत चांगले असते. परंतु, ते मुळा खाल्यानंर कारल्याची भाजी खाणे हे किंवा कारल्याच्या भाजीसोबत सलाड म्हणून मुळा खाणे हे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. कारले आणि मुळा सोबत खाल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.