हेल्दी डाएट : उन्हाळ्यात त्वचेची काळजी

सपाट पोट, बारीक मांड्या, सुडौल बांधा; परिपूर्ण शरीर असलेली स्त्री बहुतेकांसाठी स्वप्न असते, पण हे इथेच थांबत नाही!
Skin care in summer
Skin care in summersakal
Summary

सपाट पोट, बारीक मांड्या, सुडौल बांधा; परिपूर्ण शरीर असलेली स्त्री बहुतेकांसाठी स्वप्न असते, पण हे इथेच थांबत नाही!

- डॉ. रोहिणी पाटील

सपाट पोट, बारीक मांड्या, सुडौल बांधा; परिपूर्ण शरीर असलेली स्त्री बहुतेकांसाठी स्वप्न असते, पण हे इथेच थांबत नाही! तुम्ही तुमच्या शरीराला कायमस्वरूपी नितळ, निरोगी आणि तरुण बनवण्यासाठी त्याला योग्य आहारदेखील दिला पाहिजे. सुंदर त्वचा केवळ चेहऱ्याच्या महागड्या मसाजानेच येत नाही, तर आपण खात असलेल्या खाद्यपदार्थांमुळे आतूनही येते.

उन्हाळा आणि त्वचेवरील परिणाम

ऊन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. उन्हाचा त्रास फक्त गरमी होणे नाही, तर सतत येणारा घामही आहे. उन्हाळ्यात जास्त ओलावा आणि घाम एकत्र आल्याने सिबम नैसर्गिक तेल अधिक प्रमाणात तयार होते, ज्यामुळे त्वचा तेलकट होऊन पुरळ येतात. त्वचा अतिनील किरणांच्या (यूव्ही) संपर्कात आल्यावर मेलेनिनचे उत्पादन वाढते. कारण ते शरीरातील एक नैसर्गिक रसायन आहे, जे सूर्यकिरणांमुळे त्वचेच्या होणाऱ्या नुकसानापासून आपले संरक्षण करते. अतिरिक्त मेलेनिन उत्पादनामुळे त्वचेला खाज सुटते, त्वचेवर पुरळ येते आणि त्वचेचा रंग गडद होतो. याशिवाय धूम्रपान, प्रदूषण, झोप न लागणे आणि खराब आहार हे देखील त्वचा खराब होण्याचे एक कारण आहे.

त्वचेची काळजी कशी घ्यावी?

तुमची हायड्रेशन पातळी तपासा - भरपूर पाणी प्यायल्याने तुमच्या त्वचेची लवचिकता टिकून राहते, कोरड्या त्वचेमुळे होणारे पुरळ टाळता येते, सुरकुत्या कमी होतात, त्वचा मऊ होते आणि तुम्हाला तरुण दिसण्यास मदत होते. पाणी हे सर्वांत स्वस्त आणि आरोग्यदायी पेय आहे, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. याशिवाय सातूचे पेय, ताक, कोकम सरबत, लिंबूपाणी (साखरेशिवाय) या पेयांचा देखील समावेश करा. ही पेये केवळ त्वचेला चांगले हायड्रेशनच देत नाहीत, तर नितळ, तेजस्वी त्वचेसाठी महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील देतात.

भरपूर अँटी-ऑक्सिडंटनेयुक्त पदार्थांचा समावेश करा - नारळ पाणी, टरबूज, लीची, लिंबू, काकडी, किवी आणि ड्रॅगन फ्रूट यांसारखी रसदार हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. ते सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे यांनी समृद्ध आहेत, जे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या व्हिटॅमिन ए, सी, ई सारखी पोषक तत्त्वे प्रदान करतात. या पोषक घटकांमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि ते कोलेजनचे स्रोत असतात, जे तुमची त्वचा मजबूत करण्यास, तिची लवचिकता टिकवून ठेवण्यास आणि त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात.

स्कीन केअर रूटीनची निवड करा - त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य रूटीन ठरवा आणि त्याचे सातत्याने पालन करा. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यासाठी तुमचा चेहरा धुवा, बाहेर जाताना सनस्क्रीन लावा, अनावश्यक मेकअप टाळा, तुमच्या त्वचेला चांगले मॉइश्चरायझ करा आणि कमीत कमी ७-८ तासांची शांत झोप घ्या.

तेलकट, मसालेदार पदार्थ टाळा - या पदार्थांमुळे त्वचेबरोबरच पचन प्रक्रियेवरदेखील परिणाम होतो. तसेच, कोला व इतर साखरयुक्त शीतपेये टाळा. ते तुमच्या आरोग्यासाठी कोणतेही मूल्य वाढवत नाहीत, उलट तुमचे वजन वाढवू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com