Covid Vaccination: लस घेण्यापूर्वी पाणी प्यावं का?

लस घेण्यापूर्वी व नंतर पाणी पिणं गरजेचं आहे?
Water
Water

कोरोनाचा Covid वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून तरुणांपासून वृद्धांपर्यंत आतापर्यंत अनेकांनी लस घेतली आहे. मात्र, लस घेतल्यानंतर अनेकांना त्याचे साईड इफेक्ट होत असल्याचं दिसून येतं. म्हणूनच, हे साईड इफेक्ट्स टाळायची असतील तर त्यावर द्रव पदार्थांचं सेवन हा उपाय असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. तज्ज्ञांच्या मते, लस घेण्यापूर्वी व नंतर आहारात पाणी किंवा द्रव पदार्थांचा समावेश केला तर लसीकरणानंतर होणारा त्रास निश्चितच कमी होऊ शकतो. (drinking-water-after-covid-vaccination-side-effects-how-to-reduce-see-treatment)

लस घेतल्यानंतर का होतात साईड इफेक्ट्स?

लस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज निर्माण होण्यास सुरुवात होते. त्याचसोबत आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही डिफेन्स मोडवर येते. त्यामुळे लस घेतल्यानंतर किरकोळ साईड इफेक्ट्स जाणवू लागतात. कोणत्याही प्रकारची लस घेतल्यावर साधारणपणे या प्रकारचे साईड इफेक्ट्स जाणवतात.

Water
Fact Check: घरगुती उपचारांमुळे कोरोना बरा होतो? सत्य आलं समोर

पाण्यामुळे साईड इफेक्ट कमी होतात?

लसीकरणानंतर पाणी प्यायल्यामुळे होणारे साईड इफेक्ट्स टाळले जातात, हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा अद्याप सापडलेला नाही. मात्र, लस घेतल्यावर अनेकांना चक्कर येणे, बेशुद्ध पडणे अशा समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळेच पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते. परिणामी, चक्कर येण्यासारखा त्रास टाळला जातो.

पाण्याचं अतिरिक्त सेवनही घातक

लसीकरणानंतर होणारा त्रास टाळण्यासाठी अनेक जण जास्त प्रमाणात पाणी पितात. मात्र, जास्त पाणी पिणंदेखील शरीरासाठी घातक आहे. जास्त पाणी प्यायल्यामुळे शरीरातील सोडिअमची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे डोकेदुखी, अशक्तपणा अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

Water
Fact Check : कोंबडीमुळे म्युकोरमायकोसिसचा प्रसार?

लसीकरणापूर्वी व नंतर पाणी का प्यावं?

युनायटेड स्टेट्स सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंशननुसार, लस घेतल्यानंतर जर तुम्हाला ताप येत असेल तर आहारात द्रव पदार्थांचा समावेश केला पाहिजे. पाण्यामुळे शरीरातील सोडिअमची मात्रा कमी होते. परंतु, पाण्यासोबत अन्य द्रवपदार्थांचं सेवन केलं शरीरातील अन्य घटकांचं प्रमाण नियंत्रणात राहिल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com