अंड्याबरोबर खा 'हे' तीन पदार्थ, वजन होईल कमी!

अंड आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगले असते
egg for weight loss
egg for weight loss

अंड आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगले असते. त्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. शिवाय मिनरल्स, व्हिटॅमिन, हेल्दी फॅट्सही मोठ्या प्रमाणात असल्याने अंड वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये आवर्जून सामाविष्ट केले जाते. पण जर तुम्ही अंड्याबरोबर आणखी तीन पदार्थ एकत्र खाल्ल्याने वजन कमी करण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढतो. अंड्यांसोबत काही पदार्थ खाल्ल्याने काही आठवड्यांत अनेक किलोग्रॅम वजन कमी करू शकते.

egg for weight loss
वेगे वेगे चाला वजन कमी करा! Art Of Walking समजून घ्या
पालक (Spinach)
पालक (Spinach)Esakal

हे तीन पदार्थ खा

अंड आणि पालक - वजन कमी करायचं असेल तर अंड्याबरोबर पालक खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. एक कप पालकात फक्त सात कॅलरीज आणि मोठ्या प्रमाणात पोषक तत्त्व असतात. त्यामुळे कॅलरीज वाढण्याचा धोका नसतो. आयर्नने समृद्ध असलेल्या पालकामुळे आपली शक्ती आणि चयापचय वाढते. यामुळे शरीराला आवश्यक पोषक द्रव्येही मिळतात आणि दीर्घकाळ भूकही नियंत्रणात राहते.

egg for weight loss
अंड की पनीर ! वजन कमी करण्यासाठी प्रोटीनचा सर्वोत्तम पर्याय कोणता? जाणून घ्या
 Coconut oil
Coconut oil Sakal

अंड आणि नारळाचे तेल - लोणी किंवा अन्य प्रकारच्या तेलात तयार झालेले ऑम्लेट खाल्याने शरीराला जास्त कॅलरीज मिळतात. पण खोबरेल किंवा नारळाचे तेल चयापचय ५ टक्के वाढवून वजन कमी करण्यासाठी मदत करते. ३० लोकांवर केलेला अभ्यास सांगतो की एक महिना दररोज दोन चमचे नारळाच्या तेलाचे सेवन केल्याने त्यांच्या कंबरेचा आकार १.१ इंच कमी झाला. त्यमुळे वजन कमी करायचे असेल तर पुढच्या वेळी नारळाच्या तेलात ऑम्लेट तयार करा.

egg for weight loss
चाळिशीनंतर अंडं खाणं योग्य का?

अंड आणि ओटमील - ओटमील बरोबर अंड मिसळून खाल्ल्याने तुमच्या पोटाची चरबी सहज कमी करता येते. ओटमील मध्ये असणारे स्टार्च पचन मंद गतीने करते. पण भूक शांत करण्यासाठी आणि कॅलरीज बर्न करण्यासाठी पाचक ऍसिडस् महत्वाचे ठरते. ओटमील अंड्यांसोबत खाल्ल्याने आपली चयापचय क्रियाही वाढते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com