लॉकडाऊनमध्ये घरीच करा व्यायाम ; आरोग्यदायी राहण्याचा तज्ञांचा सल्ला

exercise in corona
exercise in corona

रोज मोकळ्या हवेत चालणे, टेकडीवर, वनोद्यानात जाऊन व्यायाम व योगा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेकांना ही दररोजची सवय आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन, संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी घरीच विविध व्यायाम करून आरोग्यदायी राहण्याचा सल्ला फिटनेस तज्ञांनी दिला आहे. शरीरसौष्टव, जागतिक स्पर्धेत ब्राँझ मेडिलिस्ट व सिलेब्रिटी फिटनेस ट्रेनर महेश हगवणे म्हणाले की, लॉकडाऊन मुळे घराबाहेर जाता येत नसल्याने  व्यायाम घरात करावा. यामध्ये सूर्यनमस्कार हा सर्वात शास्त्रीयदृष्ट्या योग्य व्यायाम आहे. सूर्यनमस्कार, जोर- बैठका काढणे, स्ट्रेचिंगचे व्यायाम करणे, इंटरनेटवर घरात सहजासहजी सोपे हलके झेपेल तेवढे 

हेही वाचा - पुणेकरांनो सवलतींचा गैरवापर नको; लॉकडाऊनमध्ये विनाकारण हिंडणाऱ्यांवर कारवाई
व्यायाम प्रकार आहेत. या व्यायामाच्या माध्यमातून आपण आपली प्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे. तसेच मानसिकदृष्ट्या सकारात्मक राहिले पाहिजे. आपल्या परिसरात आपले नातेवाईक मित्रपरिवार, बाहेरील कोरोनाची परिस्थिती खूप गंभीर झाली आहे. म्हणून आपण घाबरून जाऊ नये. त्याचबरोबर योग्य पौष्टिक आहार हा घेतलाच पाहिजे. 
आपली प्रतिकार शक्ती आणि आपलं आरोग्य चांगले राहू शकेल यासाठी दोन्ही जेवणाच्या वेळा पाळा. लवकर झोपण्याच्या व लवकर उठाण्याच्या वेळा देखील पाळल्याच पाहिजेत.

जगप्रसिद्ध योग शिक्षक व योगा व फिटनेस एक्सपर्ट डॉ.पल्लवी कव्हाणे म्हणाल्या की, बाहेर जाता येत नसल्याने दररोज घरी देखील योग्य व्यायाम होऊ शकतो. आपल्या आजार व तब्बेतीनुसार व्यायाम रोज किमान एक तास योगासन यासंदर्भातला व्यायाम केला पाहिजे. यामध्ये रोज अकरा वेळा तरी किमान ओमकार साधना झाली पाहिजे. त्यानंतर सूर्यनमस्कार आपणास जमतील तेवढे,  त्या नंतर उभे राहून, बसून, पाठीवरील, पोटावरील  सहज जमतील अशी कोणतीही दोन योगासने करावीत. त्यानंतर, शवासन करा. त्यानंतर कपालभारती,  प्राणायामाचे कोणतेही दोन प्रकार करा. मेडिटेशन मध्ये जमेल तसे दीर्घ श्वसनवर भर दिला पाहिजे. अशा प्रकारे सर्वांगीण व्यायाम झाला पाहिजे. व्यायामाने आपली प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे. त्याला जोडून प्रोटीन व प्रथिनयुक्त आहार घेतला पाहिजे. मनाने खचून न जाता. योग्य प्रकारे हा व्यायाम करीत जीवन आरोग्यदायी बनवा. शक्य असेल त्यांनी संध्याकाळी देखिल प्राणायाम आणि मेडिटेशन करावे. ज्यांना सराव आहे त्यांनी जलनीती नियमित देखील करावी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com