'हे' चार संकेत सांगतात तुमची लहान मुले योग्यप्रकारची अ‌ॅक्टिव्हीटी करतात की नाही?

four signs that your child not doing enough physical activities nagpur news
four signs that your child not doing enough physical activities nagpur news

नागपूर : काही लहान मुले वारंवार आळस देत असतात. हे फक्त अभ्यास करतानाच नाहीतर अनेकदा खेळताना देखील ते थकतात आणि लवकर झोपी जातात. तुमच्या मुलांमध्ये देखील अशी लक्षणे जाणवत असेल तर काळजी घ्या. कारण असे मुलं सुदृढ नसतात. त्यांच्यामध्ये ऊर्जेची कमी असते. त्यांच्या जास्तीत जास्त शारीरिक हालचाली कशा होतील? याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचा मुलगा सामर्थ्यवान राहील आणि दिवसभर त्याच्यामध्ये ऊर्जा टीकून राहील. त्याच्या शारीरिक हालचाली कमी होत आहेत का? याचे काही लक्षणे आहेत, ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

व्यायामाचा कंटाळा करणे -
व्यायाम हा लहानग्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी गरजेचा असतो. व्यायामाच्या मदतीने तुम्ही स्वतःला दिवसभर ऊर्जावान आणि ताजेतवाने ठेवू शकता. पण, याच व्यायामाचा तुमचा मुलगा कंटाळा करत असेल तर त्याच्या शारीरिक हालचाली कमी झाल्याचे हे लक्षण असू शकते.

वारंवार आळस देणे - 
मुलं वारंवार आळस देत असेल तर तुमचा मुलगा नक्कीच थकलेला असतो. त्यामुळेच तो वारंवार आराम करण्याचा विचार करत असतो. फक्त अभ्यासावेळी असे होत असेल तर आपण त्याला बहाणा म्हणू शकतो. मात्र, प्रत्येकवेळी असे होत असेल तर हे त्याची शारीरिक हालचाल कमी झाल्याचे संकेत असू शकते.

कमी आहार -
मुलं घेत असलेल्या आहाराचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्याप्रमाणे तुमची मुलं जेव्हा शारीरिक हालचाली करत असतात त्यावेळी त्यांचा आहार जास्त असतो. तसेच ते वारंवार पाणी देखील पीत असतात. पण, जेव्हा तुमचा मुलगा जेवण आणि पाणी पिणे टाळत असेल तर त्याच्या शारीरिक हालचाली कमी होऊ शकतात. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मोबाईलचा जास्त वापर -
आजकाल अनेक लहान मुलांना मोबाईल वापरण्यासाठी दिला जातो. त्यामुळे खेळण्याकडे दुर्लक्ष होऊन मुलं फक्त मोबाईलवर व्यस्त असतात. तुमचा मुलगाही वारंवार मोबाईल मागत असेल तर सावधान. त्याला मोबाईल न देता बाहेर खेळायला पाठवायला पाहिजे. तरीही तो जिद्द करत असेल तर तुमच्या मुलाच्या शारीरिक हालचाली कमी होऊन त्याला आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com