New Year 2022 : नववर्षात फिट राहण्यासाठी संकल्प केलाय, कसा कराल पूर्ण

yoga
yoga

Happy New Year 2022 : नवीन वर्ष सुरू होत आहे. नवीन वर्षात पुन्हा एकदा नवीन स्वप्न, नव्या इच्छा आणि नवीन संकल्प करण्याची ही वेळ. दर वर्षी आपण एक जानेवारीला स्वत: किती वचन देतो. पण रोजच्या धावपळीत हे पूर्ण करणे राहून जाते. त्यामुळे यंदाच्या नवीन वर्षात इतरांना नव्हे तर स्वत:ला एक वचन द्या, निरोगी आयुष्य जगण्याचे. हे वचन तुम्ही स्वत:ला द्यायला हवे. जेव्हा आपलं शरीर निरोगी राहील तेव्हाच आपले मन देखील निरोगी राहील. आजकाल आरोग्यासंबधीत समस्या वाढल्या आहे. कोणी वाढत्या वजनामुळे, कोणी वाढत्या चरबीमुळे चिंतेत असते. नवीन वर्षांमध्ये तुम्हाला स्वत:ला फिट राहायचे असेल तर २०२२मध्ये फिट राहण्याचा संकल्पा करा.

yoga
New Year 2022: नववर्ष स्वागताच्या पार्टीची शान वाढवतील ही नऊ गाणी!

लवकर उठा आणि चालायला जा

नवीन वर्षात एक गोष्ट लक्षात ठेवा की काही झाले तरी तुम्ही सकाळी लवकर उठून चालायला जा. रोज सकाळी १५ मिनिट फिरायला गेला तर तुमच्या आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडेल. सकाळी १५ मिनिट चालल्यामुळे हार्ट संबधी आजार, डायबिटीज आणि डोळ्यांच्या समस्यांपासून वाचू शकता.

एक्सरसाईज

नेहमी लोक घराच्या आसपास जीम नाही असे सांगून एक्सरसाईज करण्यापासून पळवाट शोधतात. लोकांना वाटते एक्सरसाईज फक्त मोकळ्या मैदान, पार्क किंवा जीम मध्येच करता येते पण आता वेळ बदलला आहे. लोक घरातच एक्सरसाईज करू शकतात. शरीराला फिट राहण्यासाठी तुम्ही घरीच पुशअप, चेस्ट फ्लाय, चेस्ट स्किवज सारखे एक्सरसाईज करू शकता. त्यामुळे अशा प्रकारे एक्सरसाईज करण्यासाठी तुम्ही जास्त जागा देखील लागत नाही आणि आरोग्य देखील चांगले राहते.

योगासन

रोज अर्धा तास योगा करण्यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते. असे म्हटले जाते की नेहमी योगा केल्यामुळे शरीरातील आळस निघून जातो.

yoga
NEW YEAR 2022: जगाच्या कानाकोपऱ्यातील सेलिब्रेशनची वेळ एका क्लिकवर

पाणी पिणे

नवीन वर्षामध्ये रोज कमीत कमी ३ लीटर पाणी जरूर प्या. शरीरामध्ये पुरेशी पाण्याची प्रमाण असल्यामुळे डोक शांत राहते आणि शरीराला स्फुर्ती मिळते.

पूर्ण झोप घेणे

लोक आपले कामामधून झोप पूर्ण करू शकते. झोप पूर्ण न करण्यामुळे नेहमी डोक दुखत राहणे आणि थकवा आल्यासारखा होऊ शकतो. त्यामुळे २०२१ मध्ये एका डायरीमध्ये नोट करुन ठेवा. रोज ८ ते ९ झोप गरजेची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com