काॅम्प्यूटर पेक्षा जास्त चालेल तुमची बुद्धीमत्ता आणि स्मरणशक्तीत होईल वाढ ; डायटमध्ये समावेश करा या आठ गोष्टीं 

अर्चना बनगे
Saturday, 13 February 2021

आपल्या आहारात या आठ गोष्टींचा समावेश करा आणि आपली बुद्धी ची तल्लखता कॉम्प्युटर पेक्षा अधिक गतीने वाढवा

कोल्हापूर : केवळ आपली शरीरयष्टी चांगली असून चालत नाही तर आपला मेंदू ही तेवढाच तल्लक असावा लागतो. जर बुद्धीच कमी असेल तर अशा व्यक्ती आपल्याला एक समस्या बनून राहतात. जर मानसिक स्वास्थ्य चांगले असेल तरच आपण कोणतेही काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. मेंदू जर व्यवस्थित असेल तर शरीरातील कोणतेही अवयव प्रभावीपणे काम करू शकतात. यासाठी बौद्धिक तल्लखता अत्यंत महत्त्वपूर्ण असते.

 मेंदू त्यांचेच काम अधिक प्रभावी करू शकते ज्यांची स्मरणशक्ती चांगली असते. विसराळूपणा, वाचण्यामध्ये अडथळा येणे अथवा तणावयुक्त जीवन या सर्व समस्या मेंदूचे स्वास्थ्य ठीक नसल्यास आढळून येतात. मेंदू नेहमी चांगला राहण्यासाठी त्याला विशिष्ट प्रकारच्या प्रथिनांची गरज असते. कोणती प्रथिने नियमीत वापरल्यास बुद्धीमत्ता आणि स्मरणशक्तीत  वाढ होईल घेऊया जाणून .

May be an image of food

भोपळ्याच्या बिया 

भोपळ्याची भाजी आपण सर्वजणच खातो. त्याचबरोबर पांढरा भोपळ्या पासून बनवलेले अनेक पदार्थ आपण खाल्लेले आहेत. परंतु  भोपळ्याच्या बिया किती फायदेशीर असतात याची माहिती आपण घ्यायची आहे. मेंदू आणि स्मरणशक्ती अत्यंत चांगल्या पद्धतीने ठेवण्यासाठी भोपळ्याच्या बिया अत्यंत उपयोगी ठरतात. भोपळ्याच्या बिया मध्ये जिंक असतो. तो मेंदूतील स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी मदत करतो. लहान मुलांना अशा बिया खाण्यास दिले असता त्यांची स्मरणशक्ती अधिक वाटते त्याचबरोबर बौद्धिक विकास ही चांगल्या पद्धतीने होऊ शकतो.

May be an image of food

बुद्धीसाठी फायदेशीर ठरते डार्क चॉकलेट

चॉकलेटचे अनेक तोटे आपण ऐकतो. मात्र आजच्या जमान्यात सुपर फूड मधील  डार्क चॉकलेट हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. जर तूम्हाला डार्क चॉकलेट आवडत असेल तर तूमच्यासाठी एक खुशखबर आहे. विशेष तज्ञांच्या मते डार्क चॉकलेट आपल्या हृदयाचे स्वास्थ्य चांगले  राखण्यासाठी तसेच आपले मेंदूचे काम अधिक चांगले होण्यासाठी मदत करते. आहार तज्ज्ञांच्या मते डार्क चॉकलेट मध्ये  अनेक फायबर्स मिनरल्स असतात. त्यामध्ये ओलिक आसिड, स्टेरिक अॅसिड, पामिटिक अॅसिड अशा घटकांचा समावेश असतो. चॉकलेटमध्ये जे  कार्बनिक पदार्थ आहेत ते  आपले रक्‍तदाब नियंत्रित ठेवतात. तसेच शरीरातील रक्त प्रसारन चांगल्या पद्धतीने राखण्यास मदत होते. पुरुषांच्या मध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम डार्क चॉकलेट करत असते. जर 65% कोको समाविष्ट चॉकलेट खाल्ले तर रक्तदाब नैसर्गिक रित्या नियंत्रित होते. डार्क चॉकलेट हे रक्तदाब कमी करण्यासाठी ही मदत करते. याशिवाय हृदय आणि मेंदूला जाणाऱ्या रक्त वाहिन्या शुद्ध ठेवण्यासाठी ही याची मदत होते. कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी ही चॉकलेट फायदेशीर ठरते.

May be an image of food

मेंदूसाठी ब्रोकलीचे फायदे

आपल्या मेंदूसाठी ब्रोकली अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.  या मध्ये ओमेगा-3, फॅटी ऍसिड,  व्हिटॅमिन ई आणि कॉपर यासारखे पोषक तत्व आढळून येतात. तज्ञांच्या मते ही सर्व पोषक तत्वे आपला मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी मदत करतात. यासाठी आपली कार्यक्षमता वाढवायची असेल तर ब्रोकली चे सेवन अवश्य करावे.

May be an image of food and indoor

बदाम 

बदाम खावा व आपली स्मरणशक्ती वाढवा ही म्हण अनेक वर्षापासून आहे. रोज किमान दहा ते बारा बदाम जरुर खावे. किमान दहा ते बारा  बदाम खाल्ले तरच ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतात. परंतु यापेक्षा जादा बदाम खाने हे आरोग्यास हानिकारक असते. जर आपण बदाम बरोबर ड्रायफ्रूट्स खात असाल तर याचे प्रमाण कमी करावे. बदाम हे आपण स्नॅक प्रमाणे खाऊ शकतो. त्याचबरोबर ते किसून दुधामध्ये घालून सुद्धा खाऊ शकतो. परंतु बदामाचा वरील भाग निघून जाणार नाही याची काळजी घ्यावी कारण यामुळे यात असणारे फायबर कमी होऊ शकतात. उन्हाळ्याच्या दिवसात बदाम भिजवून खाल्यास आपल्या अंगातील उष्णता कमी होण्यास मदत होते.

May be an image of fruit

हेही वाचा- *गाजराचा वापर सर्वच देशात जेवणाच्या वेळी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात केला जातो. गाजराचा  उपयोग तोंडाची चव वाढवण्या बरोबरोच पचन संस्था चांगली ठेवण्यासाठी होतो. नेमका काय उपयोग होतो वाचा सविस्तर*

 

अक्रोड

अक्रोड हे मेंदूसाठी खूपच पोष्टिक ठरते. यामध्ये असणारे अनेक पोषक तत्वे बौद्धिक क्षमता चांगली ठेवण्यासाठी मदत करतात. अक्रोड मुळे बौद्धिक क्षमता वाढीसाठी ही उपयोग होतो. त्याचबरोबर आपली बुद्धिमत्ता कायम तत्पर राहण्यास मदत होते अक्रोडमध्ये मध्ये व्हिटॅमिन ई, कॉपर , मॅगनीज हे घटक असतात जे मेंदूतील शक्ती वाढवण्यास मदत करतात.

May be an image of drink and food

ग्रीन टी

नेहमीच्या चहा पेक्षा ग्रीन टी हे अधिक उपयुक्त ठरू लागले आहे. ग्रीन टी बौद्धिक क्षमता वाढीसाठी मदत करते. ग्रीन टी घेतल्यामुळे आपण नेहमी सतर्क राहतो त्याच बरोबर आपल्या स्मृति आणि आपण ठेवलेले ध्येय परिणामकारक करण्यासाठी याची मदत होते. ग्रीन टी मुळे स्मरणशक्तीत ही वाढ होते. ग्रीन टी च्या सेवनामुळे शरीर आरामदायी बनण्यास मदत होते. त्याच बरोबर आपल्यातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी याचा उपयोग होतो.

May be an image of fruit

डाळिंब 

आपली बुद्धी तल्लख ठेवण्यासाठी काही फळे अत्यंत उपयुक्त ठरतात. यामध्ये डाळिंब मधील अनेक पोषकतत्वे यासाठी अधिक प्रभावीशील आहेत. डाळिंब खाल्ल्याने केवळ रक्त वाढच होत नाही तर आपली स्मरणशक्तीही वाढते. कोणत्याही व्यक्तीची तल्लख बुद्धी हे त्याच्या मानसिक स्वस्तावर अवलंबून असते. अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की डाळिंब मध्ये असलेले पॉलीफेनल नावाचे घटक अनेक आजारापासून दूर ठेवण्यास मदत करते. 

May be an image of fruit

द्राक्षे
भारत देशात रसाळ फळे मिळतात. रस युक्त फळांमध्ये जसे जांभूळ, स्ट्रॉबेरी, मलबरी, करवंदे, द्राक्षे अशा फळांचा समावेश होतो. द्राक्षांमध्ये आता अनेक प्रकारही आले आहेत. द्राक्षामध्ये मॅगनीज, विटामिन सी, विटामिन के, त्याचबरोबर फायबर मोठ्या प्रमाणात असतात. या मध्ये असणारे अँटी अक्सिडेंट प्लेवोनाईड्स हे मेंदूमधील  पेशी अधिक मजबूत होण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर बौद्धिक ताकद ही वाढते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health benefits Including Apply diet Eight food health marathi news