esakal | रोगप्रतिकारशक्ती चे डोळ्यांच्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे एक ग्लास किवीचा ज्युस

बोलून बातमी शोधा

kiwi juice
रोगप्रतिकारशक्ती ते डोळ्यांच्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे एक ग्लास किवीचा ज्युस
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : किवी हे फळ चवीला आंबट-गोड असून बाजारात वर्षभर उपलब्ध असते. उन्हाळ्याच्या दिवसांत किवी फळांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचे सेवन केल्याने शरीर थंड राहते. किवी फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. तसेच यामध्ये कॅलरीज देखील कमी असतात. किवीचे सेवन वजन कमी करण्यासाठी आणि पचनसंस्था चांगली ठेवण्यासाठी योग्य मदत करते. 100 ग्रॅम किवी फळांमध्ये किती घटक आढळतात. याशिवाय किवी फळ खाण्याने शरीराला काय फायदे होतात. तसेच उन्हाळ्यात किवी फळांपासून बनविलेले पेय आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे, याबाबत आज आपण पाहुयात.

हेही वाचा: रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ, दर आटोक्यात आणण्याची मागणी

१०० ग्राम किवीमध्ये असणारे पोषक तत्व -

 • कॅलरीचे प्रमाण - ६१

 • फॅट - ०.५

 • सोडियम- 3 मिलीग्राम

 • कार्बोहाइड्रेट चे प्रमाण - 15 ग्राम

 • शुगर- 9 ग्राम

 • फाइबर- 3 ग्राम

 • प्रोटीन- 1.1 ग्राम

किवीचे सेवन करण्याचे फायदे

वजन कमी करणे -

किवी फळांमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्याचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

पचनसंस्था मजबूत करण्यासाठी -

किवी फळांचा रस प्यायल्याने, पचनसंस्था योग्य प्रकारे कार्य करते आणि पोटातील समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्येवर त्याचा उपयोग होतो. उन्हाळ्यात दररोज किवीचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर आहे.

इम्यून सिस्टम मजबूत करणे -

किवीचा रस रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवितो. ज्यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. याशिवाय मधुमेह आणि हृदयरोगासाठीही फायदेशीर आहे.

हेही वाचा: पोलिस शिपायांची आंतरजिल्हा बदली रद्द

ब्लड प्रेशर कंट्रोल -

किवीमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम आणि पोटॅशिम असतात. त्यामुळे किवीचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.

डोळ्यांसाठी लाभदायक -

तुम्ही लॅपटॉप जास्त वापरत असाल तर तुमच्या डोळ्यांवर त्याचा परिणाम होतो. त्यासाठी किवीचा ज्यूसचा लाभदायक ठरतो. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी दीर्घकाळ टीकण्यास मदत होते.

प्लेटलेट्स वाढविण्यास मदत होते -

प्लेटलेट कमी असल्यास किवीचे सेवन करणे चांगले. त्याच्या वापरामुळे शरीरात प्लेटलेट्स वेगाने वाढू लागतात.

हेही वाचा: ऑनलाइन प्रेमातून मुलीला मारण्याचा प्रयत्न

किवी ड्रिंक बनविण्यासाठी साहित्य -

 • किवी - 2

 • काकडी - १

 • धणे पावडर - 1 चमचे

किवी पेय कसे तयार करावे -

 • प्रथम किवीची व्यवस्थिती साल काढून घ्या.

 • त्यानंतर किवीचे तुकडे करा.

 • नंतर काकडी सोलून घ्यावी.

 • त्यानंतर किवी आणि काकडी मिक्सरमध्ये घाला आणि पेस्ट तयार करा.

 • नंतर आवश्यकतेनुसार पेस्टमध्ये पाणी घाला.

 • नंतर धणे पूड घाला आणि मिक्स करावे.

 • आता कीवी चवदार आणि निरोगी पेय तयार आहे

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)