गुडघेदुखीची जीवघेणी वेदना होऊ शकते कमी; आक्रोडाच्या दररोजच्या सेवनाने मिळेल आराम

Walnut
Walnut

पुणे : अनहेल्दी फूडचे सेवन, एक्सरसाइज आणि वाढत्या वजनाच्या कारणाने गुडघेदुखीचा त्रास होतो. गुडघेदुखीच्या त्रासाने देशातील अनेक लोक पीडित आहेत. या समस्येंने  पीडितांची संख्या वाढतीच आहे. खासकरुन वाढत्या वयाच्या वयस्कर लोकांमध्ये ही समस्या अधिकाधिक दिसून येते. असह्य  होणारी ही गुडघेदुखी लवकरात लवकर थांबावी म्हणून लोक आर्युवेदिक, होमिओपॅथिक ते अलोपॅथीचे सर्व दवाखाने फिरतात. मात्र, तरिही यातून कायमचा आराम काही मिळताना दिसत नाही. लोक आपल्या दुखऱ्या गुडघ्यांसहित आपली कशीबशी उठबस नाईलाजास्तव सुरुच ठेवतात. मात्र, अशा लोकांसाठी एक घरगुती उपाय रामबाण ठरु शकतो. या उपायाने गुडघेदुखीत लक्षणीय प्रभाव पडून ती दूर पळू शकते. हो! म्हणूनच आपण आज या उपायाबद्दल जाणून घेणार आहोत.
आक्रोडाचे सेवन
आक्रोडाचे सेवन करणे हा उपाय वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठीचा रामबाण उपाय ठरतो. हो! याचं कारण आहे की, आक्रोडामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, विटामिन बी 6, विटामिन ई, कॅल्शियम, फॅट, कार्बोहायड्रेट सारखे असे काही मिनरल्स मिळतात जे आपल्याला या गुडघेदुखीच्या वेदनेपासून कायमची मुक्ती देऊ शकतात. आक्रोडामध्ये एँटीऑक्सिडंटसोबतच ओमेगा 3 देखील असतं. यामुळे सूज शरिरावरील सूज कमी होण्यास मदत होते. सोबतच आक्रोडाच्या सेवनाने आंथ्राईटीसची जोखिम देखील कमी होते.

याप्रकारे करा आक्रोडाचे सेवन
जर आपण देखील गुडघेदुखी आणि सांधेदुखीने त्रस्त असाल तर लवकरात लवकर आक्रोडाचे सेवन सुरु करा,. यासाठी आपण दर रात्री एक आक्रोड भिजायला ठेवा. आणि सकाळी उठल्यावर ते रिकाम्या पोटी खा. भिजवलेले बदाम खाणे आरोग्यासाठी जितके लाभदायक आहे त्याहून अधिक लाभदायक भिजवलेले आक्रोड खाणे आहे. दररोज याच्या सेवनाने आपण  लवकरच गुडघेदुखी पासून कायमची सुटका करवून घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com