तुम्हाला केसांच्या समस्येपासून सुटकारा हवाय? मग, 'या' गोष्टींचं जरुर सेवन करा

Hair Tips
Hair Tipsesakal
Summary

केसांची फक्त बाहेरूनच काळजी घेणं आवश्यक नाही, तर आतूनही काळजी घेणं आवश्यक आहे.

केसांची (Hair) फक्त बाहेरूनच काळजी घेणं आवश्यक नाही, तर आतूनही काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी चांगला सकस आहार घेणं आवश्यक आहे. केस मजबूत करण्यासाठी आहारात अशा गोष्टींचा समावेश करा, ज्यामध्ये भरपूर पोषक असतात.

तुमचे आरोग्य (Health) बिघडण्याचे रहस्य केसांवरून शोधता येते. जेव्हा तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांमधून जात असता तेव्हा तुमचे केस झपाट्याने गळू लागतात. याशिवाय अशी अनेक कारणं आहेत, ज्यामुळं केसांशी संबंधित समस्या निर्माण होतात. त्यामुळं केस आणि त्वचा अशा दोन गोष्टी आहेत. बहुतांश लोक असे आहेत की, जे त्वचा आणि केस याची खूप जास्त काळजी घेता. कारण, यांचीही तार आरोग्याप्रमाणे आपल्याला शरीरातूनच जोडलेली असते. त्यामुळं अशा परिस्थितीत केवळ बाहेरून काळजी घेणे पुरेसे नाही. तर त्यासोबतच आतूनही काळजी घेणे आवश्यक आहे. केसांना आतून निरोगी आणि मजबूत बनवण्यासाठी पौष्टिक सकस असा भरपूर आहार घ्यावा. केसांच्या वाढीसाठी पोषक घटकांपैकी प्रथिने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांची गरज पूर्ण करून केसांना आतून निरोगी बनवता येते. सोबतच त्वचारोगतज्ज्ञ अनिका गोयलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर केसांच्या निरोगी केसांसाठी सर्वोत्तम खाद्यपदार्थ सांगितले आहेत. या पाच गोष्टींचा तुम्ही आहारात समावेश करून तुम्ही तुमचे केस निरोगी बनवू शकता. जर तुम्हाला केसांच्या समस्येतून सुटकारा हवा असेल तर या गोष्टींचे सेवन नक्की करा.

Hair Tips
नखांची बुरशी टाळण्यासाठी कोणती काळजी घ्याल?, वाचा टिप्स

1) अंडी आणि मासे : अंड्यांमध्ये केवळ प्रथिनेच नसतात, तर त्यात जीवनसत्त्वे ए, ई, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. तसेच त्यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे गुणधर्म देखील आहेत. त्यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते. चमकदार केसांसाठी तेलावण्यासोबतच याचे आहारातून तुमच्या पोटात जाणे खूप फायदेशीर ठरू शकते. मासांमध्ये देखील ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर असते. जे केस गळतीवर नियंत्रण ठेवू शकते आणि सोबतच केस पांढर्‍या होण्याच्या समस्येवरही मात करू शकते.

2) काजू : काजू देखील केस निरोगी ठेवण्यास मदत करतात. पण, ते किती प्रमाणात सेवन करावे याबद्दल आपल्या तज्ञाशी सल्लामसलत करण्यास विसरू नका. अनेक वेळा जास्त सेवन केल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम दिसून येतो. वास्तविक, यामध्ये झिंक मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे केस मजबूत होतात.

Hair Tips
Premature baby : नियोजनपूर्व प्रसूतीनंतर बाळाची काळजी कशी घ्यावी ?

3) राजमा : चवीनं समृद्ध असलेला राजमा आरोग्यासोबतच केसांसाठीही खूप फायदेशीर मानला जातो. राजमांमध्ये व्हिटॅमिन सी असते. जे केस मजबूत करण्याचे काम करते. व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, त्यात फॉलिक ऍसिड, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि प्रथिने यांसारखे पोषक घटक देखील असतात.

4) फळे आणि भाज्या : मजबूत केसांसाठी फळे आणि भाज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तज्ज्ञांच्या मते आहारात बीटरूट, पालक आणि बेरी यांचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या पोषक तत्वांनी परिपूर्ण आहेत, ज्यामुळे तुमच्या केसांनाही फायदा होईल.

5) ओट्स : केसांना बाहेरूनच नव्हे तर आतूनही निरोगी बनवण्यासाठी ओट्स हा उत्तम घटक असू शकतो. अनेक महिला ओट्स हेअर मास्क केसांवर लावतात. त्याचा आहारात समावेश केल्यास केसांना आतून मजबूती येते. यामध्ये असलेले प्रोटीन, थायमिन, नियासिन, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी12, फॉस्फरस, रिबोफ्लेविन, फोलेट यांसारखे पोषक घटक केसांच्या समस्यांपासून आराम देतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com