esakal | Health Tips - गवार खा! पोटाच्या आजरांपासून दूर रहा, वजनही राहिल नियंत्रणात
sakal

बोलून बातमी शोधा

gaur

हृदयासंबधी काही समस्या दुर करायच्या असतील तर गवार खाल्ल्याने फायदा होतो.

Health Tips - गवार खा! पोटाच्या आजरांपासून दूर रहा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

शरीर तंदुरुस्त ठेवायचे असल्यास हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टर हा सल्ला अनेकांना देतात. आहारात या भाज्यांचा समावेश केल्यास अनेक समस्या दूर राहतात. भाज्या खाल्ल्याने पोटाच्या विकारांपासून मुक्तता मिळते. सोबत वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. गवार ही त्यापैकीच एक महत्वाची फळभाजी. याला क्लस्टर बीन्स असेही म्हटंल जाते. अनेक पोषकतत्वे असलेली गावर आरोग्यासाठी फायदेशीर असते. वजन कमी करण्यासाठी गवार उपयोगी पडते. याशिवाय हृदयासंबधी काही समस्या दुर करायच्या असतील तर गवार खाल्ल्याने फायदा होतो. आज आम्ही तुम्हाला गवारीचे तीन फायदे सांगणार आहोत, ज्याचा वापर तुम्ही आहारात करु शकता.

वजन कमी होते

वजन वाढतंय या समस्येने अनेकजण चिंतीत आणि काळजीत असतात. तासंतास एकाच जागी बसून काम करणे, फास्ट फुड खाणे अशी अनेक कारणांमुळे तुमचं वजन वाढतं. वाढणाऱ्या वजनाला कमी करण्यासाठी गवारचा वापर होतो. यासाठी आहारता गवारचा सर्रास वापर करावा. यामध्ये असणारे फायबर वजन नियंत्रित ठेवतात. अनेकजण याचा सॅलड म्हणूनही उपयोग करतात.

हेही वाचा: वयाच्या 30 व्या वर्षात महिलांनी 'या' 5 सप्लीमेंट्स घ्याव्यात

पोटाच्या आजारांपासून मुक्तता

जर तुम्हाला कब्जची समस्या असेल तर तुम्ही आहारात गवारच्या भाजीचा वापर करु शकता. यात असलेले फायबरचे प्रमाण कब्जला कमी करतात. पचनाच्या अनेक समस्या यामुळे दूर होतात. यामुळे पोट साफ राहण्यास मदत होते.

हाडे मजबूत राहतात

हाडांना मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शिअम असलेल्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. गवार मधून कॅल्शिअम मिळते. यामध्ये उपलब्ध असणारे कॅल्शिअम आणि फॉस्फरस हाडे मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे शरीरही हेल्दी राहते. गवार तुम्ही भाजी किंवा सॅलडच्या स्वरुपातही खाऊ शकता.

हेही वाचा: Fatty Liver Disease टाळण्यासाठी काय खावे, काय नको?

loading image
go to top