दिनचर्येत 'हा' बदल केल्यास कधीच होणार नाही म्युकोरमायकोसिस!

mucormycosis च्या रुग्णाची घ्या 'ही' काळजी
Mucormycosis
MucormycosisSakal

गेल्या दीड वर्षांपासून प्रत्येक जण कोरोना विषाणूसोबत लढा देत आहे. विशेष म्हणजे आता कुठे या विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होतांना दिसत आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग जरी कमी होत असला तरीदेखील ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकोरमायकोसिस या नव्या आजाराने डोकं वर काढलं आहे. कोरोनावर मात केलेल्या अनेक रुग्णांना हा नवा आजार होत असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या आजारावर होणारा खर्चदेखील अफाट असून एका दिवसाचा खर्च ३५ हजार रुपये असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळेच या आजारावर मात करायची असेल तर वैद्यकीय उपचारांसोबत आपल्या दिनचर्येतदेखील काही मुलभूत बदल करणं गरजेचं आहे. (health What measures to prevent mucormycosis)

विलगीकरणात असलेले किंवा कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना म्युकोरमायकोसिस होऊ नये यासाठी रुग्णांनी त्यांच्या दिनचर्येत काही मुलभूत बदल करणं गरजेचं आहे. त्यामुळेच पुण्यातील सुरज आयुर्वेद क्लिनिक अॅण्ड रिसर्च सेंटरचे डॉ. घनश्याम मर्दा यांनी म्युकोरमायकोसिस टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात ते सांगितलं आहे.

Mucormycosis
होम आयसोलेशनमध्ये आहात? मग फॉलो करा 'या' गोष्टी
Mucormycosis
भगवान शंकराचं आक्षेपार्ह GIF; इन्स्टाग्राम विरोधात FIR दाखल

दररोज फॉलो करा 'ही' दिनचर्या

१. कोमट पाण्यात मीठ आणि लवंग तेलाचे २ थेंब टाकून या पाण्याने दिवसातून ३ वेळा गुळण्या कराव्यात.

२. खोबरेल तेलात चिमूटभर मीठ टाकून या तेलाचे २-३ थेंब नाकात सोडावे. थोड्या वेळाने नाक शिंकरुन स्वच्छ करावे. जर नाकात जळजळ होत असेल तर नाकात तूप टाकावे.

३. ओवा आणि वेखंड यांची पुरचुंडी करुन त्याचा सतत वास घ्यावा. किंवा, घरात धुरी करावी.

४. शहाजिरं,दालचिनी, तमालपत्र, वेलची, नागकेशर यांची पावडर करुन ती हुंगावी. त्यामुळे नाक मोकळं होतं.

५. ओवा किंवा मसाल्याच्या पदार्थांची धुरी करुन ती नाकाने आत ओढावी व तोंडातून बाहेर सोडावी.

६. डोळ्यात काजळ घालावं.

७. काजळाला पर्याय म्हणून त्रिफलांजन सारखे आयड्रॉप्सही डोळ्यात सोडले तरी चालेल.

८. अभ्यंग स्नान करावे.

९. अंघोळ करतांना पाण्यात तेलाचे काही थेंब टाकावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com