Weight Loss: वजन कमी होणं चांगलं नाही खरंतर खूप वाईट... तुमचही वजन झालं आहे का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weight Loss

Weight Loss: वजन कमी होणं चांगलं नाही खरंतर खूप वाईट... तुमचही वजन झालं आहे का?

Weight Loss: आपलं थोडंसं वजन कमी झालं की लगेच आपण खूप खूश होतो. अरे वाह... बरं झालं काहीही न करता मस्त वजन कमी झालं. पण वजन कमी होण्यामागे काही कारणं असतात हे तुम्हाला माहिती आहे का? आपलं असं कोणतेही प्रयत्न करता वजन कमी होणं खरंतर खूप वाईट. हे अनेक आजरांचे संकेत देखील असू शकतात.

आपल्याकडे अनेकांना वाढत्या वजनाने तर अनेकांना वजन कमी झाल्याने त्रास होतो. बिझी लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी ही यामागची प्रमुख कारणे आहेत. यामुळेच जिथे वाढत्या वजनामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्याचप्रमाणे कमी वजनामुळेही अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

वजन न वाढल्याने असे लोक कुपोषणालाही बळी पडतात. जर तुमचेही वजन सपाट्याने कमी होत असेल तर सावध व्हा. अनेकांना वाटते की वजन वाढवण्यासाठी जंक फूड आणि अनहेल्दी फूड खावे पण याने तुमचा त्रास आणखी वाढेल. तथापि, डॉक्टरांनी अनेक आरोग्यदायी मार्ग सुचवले आहेत ज्याचा अवलंब करुन तुम्ही तुमचे वजन कोणत्याही समस्येशिवाय वाढवू शकता, चला त्याबद्दल जाणून घेऊया...

1. हाय कॅलरी फूड (High Calary Food): 

डॉक्टरांच्या मते वजन वाढवण्यासाठी हाय कॅलरी फूड खावे. हाय कॅलरी फूड खाल्ल्याने, तुम्ही दिवसभरातील कॅलरीज वाढवाल आणि तुमचे वजन निरोगी पद्धतीने वाढेल. तुम्ही तुमच्या आहारात फळे, एवोकॅडो, चीज, पनीर, ब्रेड, दूध, दुधाची मलई, बटाटे, चिकन आणि मासे यासारखे हाय फायबर आणि कॅलरी असलेले पदार्थ समाविष्ट करू शकता.

2. जास्त वेळा खा: 

लोक सहसा दिवसातून तीन वेळा खातात म्हणजे फक्त नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण. पण काही लोक नाश्ताही करत नाहीत. फक्त दुपारी आणि रात्री जेवतात. असं करणं टाळा, दिवसातून थेट तीन जेवणांऐवजी, दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने काही ना काही लहान सहान खाण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला पोट भरल्याशिवाय तुमच्या कॅलरीजचे प्रमाण वाढविण्यात मदत करू शकते.

3. हाय प्रोटीन फूड (High Protein Food):

हाय प्रोटीन फूडबरोबरच, तुम्ही हाय प्रोटीन फूड देखील खायला हवे. तुमच्या आहारात चिकन, मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ यासारख्या उच्च प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. रोज सकाळी एक ग्लास दूध प्या. शक्य असेल तर सोबत किमान दोन काजू आणि बदाम खा. किंवा तुम्ही त्याची पूड करुन दुधातून देखील घेऊ शकतात. 

4. वर्कआउट (Daily Workout):

नियमित वर्कआउट केल्याने तुमचे वजन वाढू शकते. व्यायामामुळे स्नायू तयार होण्यास मदत होते. वर्कआउटमध्ये तुम्ही वेट लिफ्टिंग, बॉडीवेट एक्सरसाइज आणि रेझिस्टन्स बँड वर्कआउट्सचा समावेश करू शकता. व्यायामाव्यतिरिक्त तुम्ही योगाही करू शकता.

5. सवयी बदला (Daily Routine): 

तुम्हाला निरोगी मार्गाने वजन वाढविण्यात मदत करण्यासाठी, तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये हळू आणि स्थिर बदल करा. अधिकाधिक पाणी प्या आणि पूर्ण झोप घ्या.