esakal | Health Tips - बेसन कढी खायला आवडते का? मग वाचा फायदे
sakal

बोलून बातमी शोधा

बेसन कढी खायला आवडते का? मग वाचा फायदे

सण समारंभालाही आठवणीने हा पदार्थ बनवला जातो. यात बेसनचा वापर असतो.

बेसन कढी खायला आवडते का? मग वाचा फायदे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बेसनच्या पीठ लावलेली कढी आपण अनेकवेळा खाल्ली असेल. कढीचे अनेक प्रकार आहेत. प्रदेशानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या कढी बनवल्या जातात. कढी बुंदी, बटाटा कढी याला आपण अधिक पसंती देतो. परंतु यातही सर्वात अधिक खाल्ली जाते ती म्हणजे बेसन्या भजींची कढी. देशात अनेक भागांत बेसन कढी शुभ मानली जाते. सण समारंभालाही आठवणीने हा पदार्थ बनवला जातो. यात बेसनचा वापर असतो. परंतु या कढीतून फक्त स्वादच नाही तर काही पोषकतत्वेही मिळतात. आरोग्याला याचे अनेक फायदे होतात. याबाबतचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.

हिमोग्लोबीन वाढवण्यास मदत

बेसन कढी आरोग्यासाठी फायद्याची आह. बेसन कढीमध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण असल्याने हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.

वाढीसाठी मदत

कढीमध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, फॉस्फसर, व्हिटामिन्सचे प्रमाण अधिक असते. यामुळे शरीरच्या काही अवयवांना आणि त्यांच्या वाढीसाठी हे मदत होते.

हेही वाचा: भटकंतीसाठी बीचवर जाताय? अशी घ्या केसांची काळजी

स्किन प्रोब्लेम्स दुर ठेवते

बेसन कढी सन कोलेजन वाढवण्यास मदत करतात. यामुळे स्किन स्मुथ राहण्यास मदत होते. यासोबत अॅंटी-इन्फ्लेमेंटरीचे गुण असल्याने स्किन अॅक्ने, काळे डाग, टॅनिंग असे स्किन प्रॉब्लेम्स दूर करण्यास मदत करते.

डायबिटीजसाठी

बेसनच्या कढीमध्ये कार्बोहायड्रेड आणि फोलेट असतात. यासोबत कढीमध्ये ग्लाईसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असते. यामुळे डायबेटिज पेशंटला कढी खाणे फायद्याचे ठरु शकते.

पचनक्रीयेसाठी

कढी पचनक्रीयेला दुरुस्त ठेवते. यामध्ये बॅक्टेरियाचे चांगेल प्रमाण असते जे पोटासाठी उत्तम मानले जाते.

हेही वाचा: Health tips : दूध, दह्याच्या नियमित सेवनाने हृदयरोगाचा धोका कमी

गर्भावस्थेत बाळाच्या वाढीसाठी -

गर्भावस्थेत महिलांना कढी खाल्ल्याने बाळाच्या वाढीला त्याचा फायदा होतो. कढीमध्ये असलेले फोलिएट, व्हिटॅमिन B6 आणि लोह असे काही पोषकतत्वे यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात.

loading image
go to top