esakal | कोरोनाग्रस्त मातांच्या नवजात बालकांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली|Corona Infected Mothers child Immune System
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाग्रस्त मातांच्या नवजात बालकांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली

कोरोनाग्रस्त मातांच्या नवजात बालकांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोनाची लागण झालेल्या मातांच्या नवजात बालकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती( immune cells) अधिक प्रमाणात असू शकते. ब्रिटनच्या किंग्ज कॉलेज येथील लंडनच्या संशोधकांनी कोरोनाची लागण होऊन बाळाला जन्म दिलेल्या 30 मातांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. त्या महिला नऊ महिन्याच्या काळात कोरोनाग्रस्त होत्या. कोरोना संक्रमणामुळे नवजात बालकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर (immune cells) परिणाम होत असल्याचे संशोधक सांगतात गर्भात असणाऱया बाळावर नाळेद्वारे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिपिंडे (antibodies) तयार होत असल्याचेही संशोधकांच्या लक्षात आले. आईला होणाऱया संक्रमणाबाबत अधिक होणे गरेजेचे आहे, कारण आईला होणाऱ्या संक्रमणामुळे बाळाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर कसा परिणाम होतो हे पाहणेही गरजेचे आहे.

मात्र, केवळ आईवर अवलंबून असल्याने संक्रमण न होताही नवजात बालकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याचे अभ्यासामुळे स्पष्ट झाल्याचे किंग्ज कॉलेजचे शास्त्रज्ञ डीना गिबंस यांनी सांगितले.

हेही वाचा: आरोग्याच्या दुर्लक्षातूनच वाढले मानसिक आजार

loading image
go to top