थंडीच्या दिवसातही कमी करा वजन; 'हे' आहेत तीन उत्तम पर्याय

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 December 2019

थंडीच्या दिवसांत आपला आहार हा तुल्यबळ असल्याने आणि थंडी शरीरासाठी पोषक असल्याने लवकर वजन वाढते. पंरतु, आपण जर आपला आहार संतुलित ठेवला तर आपले वजन वाढणार नाही. त्यासाठी काही डाएट प्लॅन तयार करायला हवा. डाएट प्लॅननुसार आहार घेतल्यास आपले वजन वाढणार नाही. शिवाय ते कमी होण्यासही मदत होईल. 

पुणे : थंडीच्या दिवसांत नेहमीच वजन वाढलेले आपल्याला पाहायला मिळते. वजन वाढताना ते खूप लवकर वाढते परंतु, कमी करताना मात्र त्रासदायक ठरते. नानाविध पर्याय करुन पाहिले तरी थंडीच्या दिवसांत मात्र काही केल्या वजन कमी होत नाही. थंडीच्या दिवसांत आपला आहार हा तुल्यबळ असल्याने आणि थंडी शरीरासाठी पोषक असल्याने लवकर वजन वाढते. पंरतु, आपण जर आपला आहार संतुलित ठेवला तर आपले वजन वाढणार नाही. त्यासाठी काही डाएट प्लॅन तयार करायला हवा. डाएट प्लॅननुसार आहार घेतल्यास आपले वजन वाढणार नाही. शिवाय ते कमी होण्यासही मदत होईल. 

थंडीच्या दिवसात वजन कमी करण्यासाठी खालील तीन गोष्टी खाल्यास वजन कमी होऊ शकते.

१) गाजर : थंडीच्या दिवसात गाजर खाल्यास आपल्याला फायदा होतो. थंडीच्या दिवसांत जवळपास सर्व पालेभाज्या आणि फळे ही बाजारात सहज उपलब्ध असतात. थंडीच्या दिवसांत गाजरही बाजारात उपलब्ध असते. जर तुम्ही आपल्या आहारात गाजराच्या पदार्थांचा समावेश केला तर तुम्हाला ते अत्यंत फायदेशीर ठरू शकते. गाजरापासून बनवलेला ज्यूस तसेच गाजराचा हलवाही आपण खाऊ शकतो. तसेच कच्चे गाजरही आपण खाऊ शकतो.

Image result for गाजर"

२) मेथी : मेथीचा दाना-दाना हा आपल्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो. मेथी ही पचनासाठी अत्यंत उपयुक्त असते. मेथी ही थंडीच्या दिवसांत येते. मोसमानुसार येणारी ही भाजी असून थंडीच्या दिवसांत खूप फायदेशीर ठरू शकते. पचन व्यवस्थित झाल्याने विणाकरण आपले वजन वाढत नाही. याचाही फायदा मेथीची भाजी खाल्याने होतो. म्हणून आपल्या आहारात मेथीच्या भाजीचा समावेश केल्यास फायद्याचे ठरते.

Image result for मेथी"

३) दालचिनी : दालचिनी ही डायबिटीज असणाऱ्यां माणसांसाठी अत्यंत उपयुक्त असते. तसेच, वजन कमी करण्यासाठी ही दालचिनी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगण्यात येते. थंडीच्या दिवसांत वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात दालचिनीचा समावेश करणे त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. दिवसांतून तीन वेळा गरम पाण्यात दालचिनी आणि मध टाकून पिल्यास हे अत्यंत फायदेशीर ठरते. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी, नाष्ट्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी असे हे पाणी तीनवेळा पिल्यास लवकर वजन कमी होण्यास मदत होते.

Image result for दालचीनी"


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to reduce weight in winter information in marathi

Tags
टॉपिकस
Topic Tags: