ब्रेकफास्ट, कॉफी वाढवू शकते तुमचे मेटाबोलिझम; वजनही होईल झटपट कमी

health
healthe sakal

नागपूर : वजन कमी करण्यासाठी चयापचय क्रिया चांगली असणे महत्वाचे आहे. मात्र, धावपळीच्या जीवनशैलीमुळे चयापचय क्रियेवर परिणाम होतो. आपण अशा काही चुका करतो की या आपली चयापचय क्रिया मंद करतात. त्यामुळे आपले वजन वाढण्यास सुरुवात होते. चयापचय क्रियेची गती ही वय, लिंग, फॅट, मांसपेशी या सर्व बाबींवर अवलंबून असते. काहींमध्ये अनुवंशिक देखील असते. मात्र, आहारामधील काही चुका या तुमची चयापचय क्रिया कमी करून शकतात.

ब्रेकफास्ट चुकवू नका -

वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीज घेणे गरजेचे आहे. मात्र, आपल्या आहारापेक्षा अंत्यत कमी कॅलरीज घेतल्या तर तुमची चयापचय क्रिया मंद होण्याचा धोका असतो. त्यामुळे वजन कमी करायचे असले तरी कॅलरीज अधिक कमी करून नका. तुम्हाला भूख लागणार नाही इतकेच जेवण करा. कमी जेवल्याने शरीरामध्ये अन्नाची कमी जाणवते. त्यामुळे देखील वजन वाढते आणि चयापचय क्रियेवर परिणाम होतो.

हेही वाचा - 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'चा फज्जा, संपर्कातील हजारो रस्त्यावर

जेवण करणे टाळणे -

वजन कमी करण्यासाठी किंवा अनियमित दिनचर्येमुळे अनेक जेवणे टाळतात. मात्र, कमी खाल्ल्यामुळे वजन कमी होते, हे मिथ आहे. त्यामुळे थोड्या थोड्या वेळानी थोंड थोड अन्न खायला पाहिजे. तसेच हेल्दी फूड खाणे गरजेचे आहे जंक फूड खाल्ल्याने देखील चयापचय क्रियेवर परिणाम होतो.

आहारामध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढवा -

प्रत्येक जेवणामध्ये काही प्रमाणात प्रोटीन असणे गरजेचे आहे. मांसपेशी बनविण्यासाठी प्रोटीनची गरज असते. हेल्दी वजन ठेवण्यासाठी प्रोटीन महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात. तसेच चयापचय क्रिया हेल्दी ठेवण्यासाठी देखील प्रोटीन चांगले असते.

व्यायाम करा -

फॅटच्या तुलनेत कॅलरीजचा मांसपेशीमध्ये अधिक प्रमाणात वापर होतो. त्यामुळे नेहमी मांसपेशी भरून काढण्यासाठी व्यायाम करा. त्यामुळे चयापचय क्रिया देखील सुधारते.

हेही वाचा - 'मेडिकल'च्या किचनमधील कर्मचाऱ्याचाच कोरोनानं मृत्यू

कॉफी प्या -

कॅफीन हे चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करते. एक कप चहा किंवा कॉफी चयापचय क्रिया सुधारते. मात्र, काही लोकांना कॅफीनची गरज नसते. त्यांनी कॅफीनपासून दूर राहावे.

जीवनसत्व ड चे सेवन करा -

चयापचय क्रिया सुदृढ राहण्यासाठी जीवनसत्व ड खाणे गरजेचे आहे. यासाठी आहारामध्ये टोफू, अंडी, मांसे आदी पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे तुमच्या शरीराला जीवनसत्व ड मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com