शरीराच्या दुर्गंधीपासून कशी मिळवाल सुटका? जाणून घ्या घरगूती उपाय

नो साईड इफेक्ट, जाणून घ्या घरच्या घरी Ayurvedic deodorant कसे तयार करायचे
शरीराच्या दुर्गंधीपासून कशी मिळवाल सुटका? जाणून घ्या घरगूती उपाय

Ayurvedic deodorant: शरीराची दुर्गंधी(Body Smell) कोणत्याही ऋतुमध्ये होणारी सामान्य समास्या आहे ज्यापासून सुटता मिळविण्यासाठी बहुतेक लोक डिओडरेंड किंवा परफ्यूम(Deodorant Or Perfume) वापरतात. पण तुम्हाला हे ऐकूण आश्चर्य वाटले की, मार्केटमध्ये मिळणारे बहुतेक डिओडरंट हानिकारक केमीकलपासून बनलेले आहेत जे तुमच्या आरोग्याला नुकसान पोहचवू शकते. काही रिसर्चमध्ये डिओडरेंडला ब्रेस्ट कॅन्सरसाठी कारणीभुत असल्याचे सांगितले आहे, पण याचा कोणताही ठोस पुरावा नाही. पण केमीकलच्या डिओडरेंटमध्ये तुमच्या त्वचेचे नक्कीच नुकासान पोहचवू शकतात.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की, डिओडरेंटला पर्याय काय? या प्रश्नाचे उत्तर आहे नॅचरल डिओडरेंट जे नवीन 100 टक्के आयुर्वेंदीत उत्पादानांपासून बनवले गेले आहे आणि त्यामुळे ते तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. आयुर्वेदिक चिकित्सक डॉ अपर्णा पद्मानाभनच्या माध्यमातून येथे तुम्हाला नैसर्गिक डिओडेरेंट बनविण्याची प्रक्रिया आणि साहित्य सांगितले आहे.

आयुर्वेदिक डिओडरेंट्स बनविण्याची सोपी रेसिपी

नारळ चंदन डिओर्डरेंट

नारळाचे तेल - 1/3 भाग

बेकींग सोडा - 1/4 भाग

टॅपिओका आटा -1/4 भाग

चंदन एसेंशियल ऑईल- 3-4 थेंब (हे पित्त संतुलित करते आणि त्वचेला शांत कते)

कृती : डिओडरेंट बनविण्यासाठी सर्व साहित्या व्यवस्थित एकत्र करा. त्याची पेस्ट बनवून त्यामध्ये नारळाचे तेल टाका. हे मिश्रण एका टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा. गरज असेल तेव्हा तुमच्या अंडरआर्म्समध्ये लावा.

2. बदाम डिओडरेंट

बदामाचे तेल- 1/3 भाग

बेकिंग सोड़ा- 1/4 भाग

कॉर्नस्टार्च- 1/4 भाग

एसेंशियल ऑईल- 4-5 थेंब

कृती : सर्व साहित्य एकत्रित करुन मिश्रण एका टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा.शरीराच्या वास घालविण्यासाठी आपल्या अंडरआर्म्सवर लावा.

3. कोकोनट डिओडरेंट

नारियल का तेल- 1/3 भाग

बेकिंग सोड़ा- 1/4 भाग

अरारोट- 1/4 भाग नीम

इसेंशियल ऑयल- 4-5 थेेंब( अंडरआर्म्स लाल झाले असेल किंवा खाज येत असल्यास फायदेशीर)

कृती : सर्व साहित्य एकत्रित करुन मिश्रण एका टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा.शरीराच्या वास घालविण्यासाठी आपल्या अंडरआर्म्सवर लावा.

4. गुलाब डिओडरेंट

बेकिंग सोड़ा – 1 चिमुट

गुलाब जल / प्लेन वाटर – 1-2 थेंब

कृती : सर्व साहित्य एकत्र करुन पेस्ट बनवा आणि रोज अंघोळ केल्यानंतर लावा. हे मिश्रण रोज ताजे बनवा.

या गोष्टींची घ्या काळजी

हे आयुर्वेदिक डिओडरेंट फक्त क्लीन शेव्ड अंडरआर्म्सवर लावणे फायदेशीर असते. शेविंगमध्ये लगेच बेकिंग सोडा लावल्यानंतर थोड्यावेळ आग होऊ शकते. त्याशिवाय

ज्यांची त्वचा अतिसवेंदनशील आहे त्याच्यासाठी बदाम आणि नारळाचे तेलाचे डिओडेरेंट फायदेशीर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com