मसल्स वाढवायचे आहेत ? मग घरीच बनवा Natural Protein Powder

मसल्स वाढवायचे आहेत ? मग घरीच बनवा Natural Protein Powder
Summary

बॉडी आणि मसल्स वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ब्रॅंडचे आणि फ्लेवर्सच्या प्रोटीन पावडरचे सेवन केले जाते.

बऱ्याच वेळा वजन किंवा मसल्स वाढवण्यासाठी प्रोटीन पावडरचे सेवन केले जाते. परंतु अनेकजण याचे सेवन न करण्याचा सल्ला देतात. कारण शरीरासाठी याचे साईड ईफेक्ट्स उद्भवू शकतात, असे अनेकांचे म्हणणे आहे. युवकवर्गात याची क्रेझ अधिक दिसून येते. बॉडी आणि मसल्स वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ब्रॅंडचे आणि फ्लेवर्सच्या प्रोटीन पावडरचे सेवन केले जाते. मात्र हे तितकेच घातक ठरु शकते. परंतु तुम्ही यासाठी काही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन सेवन करु शकता. यावर आणखी एक उपाय म्हणजे तुम्ही घरीच नैसर्गिक प्रोटीन पावडर तयार करु शकता. यामुळे तुमचे पैसेही वाचतील आणि याचे शरीरावर काही इतर परीणामही होणार नाहीत.

प्रोटीन पावडर बनवण्याचे साहित्य -

  • १० ते १५ मखाने

  • १० बदाम

  • २ आक्रोड

  • १ छोटा चमचा सोफ

  • १ छोटा चमचा मिश्री

  • २ वेलची

  • २ केसरचे धागे

  • १ चिमूटभर काळी मिरची

  • १ चमचा मिक्स बिया

मसल्स वाढवायचे आहेत ? मग घरीच बनवा Natural Protein Powder
हेअर ट्रिटमेंट घेताना घ्या काळजी, चुकीची उत्पादने वापरल्यास गंभीर आजाराची शक्यता

कृती -

सुरुवातीला बदाम आणि मखानला नीट भाजून घ्या. थंड झाल्यानंतर वर सांगितलेली सर्व सामग्री योग्य प्रकारे एका भांड्यात बारीक करुन वाटून घ्या. ही तयार पावडर एका बंद डब्यात पॅक करुन ठेऊ शकता. एका ग्लासमध्ये दूध आणि एक छोटा चमचा प्रोटीन पावडर टाकून तुम्ही हे दररोज दूध पिऊ शकता. यामुळे हळुहळू तुमचे मसल्सची साइज वाढण्यास सुरुवात होईल. तुम्हाला इतर कोणत्याही त्रासाशिवाय बिनधास्त या पावडरचा वापर करता येतो.

नैसर्गिक प्रोटीन पावडरचे फायदे

आज बाजारात अनेक प्रकारच्या प्रोटीन पावडर उपलब्ध झाल्या आहेत. ज्यामध्ये अनेक घटकांचा समावेश असू शकतो. तसेच यामध्ये साखरेचे प्रमाण ही अधिक असते. जे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. यामुळे घरी तयार केलेल्या प्रोटीन पावडरचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. याला एक उत्तम स्वाद द्यायचा असल्यास तुम्ही कोको पावडरही वापरु शकता.

मसल्स वाढवायचे आहेत ? मग घरीच बनवा Natural Protein Powder
गरजपेक्षा जास्त पाणी पिणे देखील किडनी-हार्टसाठी ठरु शकते धोकादायक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com