Imposter Syndrome : तुम्हाला क्षमतेपेक्षा जास्त मिळतंय असं कधी वाटलंय? याला निःस्वार्थी नाही, तर...

स्वतःची प्रतिभा स्वीकारून त्याचं श्रेय घ्यायला हवंं. नाहीतर त्याला इम्पोस्टर सिंड्रोम म्हणतात.
Imposter Syndrome
Imposter Syndromeesakal

What Is Imposter Syndrome : फेसबुकच्या माजी सीओओ शेरील सँडबर्ग यांना हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेताना प्रत्येक परीक्षेच्यावेळी वाटायचे की त्यांचा पेपर चांगला गेला नाही. पण निकाल आल्यावर गुण चांगले असायचे. तरीही ते आपल्या क्षमतेपेक्षा अपघाताने मिळाले असंच त्यांना वाटायचे.

जेव्हा याची चिकीत्सा केली तेव्हा त्यांना समजले की, त्या इम्पोस्टर सिंड्रोमग्रस्त आहेत. ही एक मानसिक स्थिती आहे जेव्हा माणूस स्वतःच्या क्षमतांवर शंका घेतो.

Imposter Syndrome
Imposter Syndromeesakal

मिशेल ओबामा यांनाही होता हा सिंड्रोम

जगातले अनेक सेलिब्रिटी शेरिल यांच्यासारखे या सिंड्रोमचे बळी ठरले आहेत. स्टारबक्सचे माजी सीईओ हॉवर्ड शुल्टझ यांनाही या आजाराने ग्रासले होते. सीईओ पदासाठी आपण योग्य नसल्याचं त्यांना वाटायचं. सीईओ म्हणून त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. याशिवाय अमेरीकाच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनीही कबूल केले आहे की, त्यांनाही कधीकधी इम्पोस्टर सिंड्रोमचा सामना करावा लागला आहे.

पण त्यांनी त्यांच्या कमतरतांपेक्षा सामर्थ्यावर लक्ष केंद्रित केलं. आणि आत्मविश्वास पुन्हा मिळवला. अशावेळी व्यावसायिक जीवनाच्या दृष्टीने या सिंड्रोमचा उल्लेख करणे आवश्यक आहे.

Imposter Syndrome
Mental Health : वारंवार हात धुताय ? तुम्हाला झाला आहे हा आजार
Imposter Syndrome
Imposter Syndromeesakal

आत्मसन्मान कमी होतो

ही गोष्ट सध्या सेलिब्रिटींपासून सामान्य माणूस सगळ्यांमध्ये दिसून येत आहे. मानसशास्त्रज्ञ म्हणतात यात लोक कामात यशस्वी होऊनही स्वतःला यशस्वी मानत नाहीत. त्यामुळे त्यांचा आत्मसन्मान कमी होतो. आणि ते अपयशी होऊ लागतात. लोक त्यांच्या लहान चुकांवर जास्त लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे चिंता आणि ताण वाढतो. अशावेळी समस्या वेळीच ओळखून त्यावर आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Imposter Syndrome
Mental Health : कोणी कोणाचं नसतं हेच खरं; डिप्रेशनमधून बाहेर पडायला स्वत:ला अशी करा मदत!  

हे उपाय करा

दिवसाच्या दैनंदिन यशाची नोंद घ्या - दिवसभारातल्या कामांची यादी तयार करा. त्यात दिवसभरातल्या लहान मोठ्या यशांबद्दल लिहा. आणि ते यश कसे संपादन केले ते पण लिहा.

यशाबद्दल अधिक बोला - तुमच्या यशाचं श्रेय स्वतःकडे घ्यायला शिका. जसे इतरांच्या यशाबद्दल बोलतात, तसे स्वतःच्या यशाबद्दल बोला. विकासाची मानसिकता स्वीकारा. आव्हाने टाळण्याऐवजी स्वीकारा, चुकांना घाबरू नका. योग्य मार्गदर्शक शोधा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com