डोळ्यांचे आरोग्य जपताय? हे 5 पदार्थ तुमच्या आहारात आहेत का?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

आहारातील पोषक तत्वे फक्त शरीरालच नव्हे तर डोळ्यांसाठी देखील गरजेचे असतात. पण हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही तुमच्या आहारात डोळ्यांचे आरोग्य जपणाऱ्या पदार्थांचा सामावेश कराल. डोळ्यांची नजर कमजोर होऊ नये यासाठी तुम्हाला खुप सारे पोषक तत्व असलेल्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.

पुणे : बदलत्या जीवन शैलीमध्ये आपण तासन तास कंप्युटरवर काम करणे, मोबाईलवर टाईमपास करणे हे नेहमीच झाले आहे. त्यामुळे आपल्या डोळ्यांवर प्रचंड ताण येतो असतो. डोळे हा आपल्या शरीरातील सर्वात नाजुक आणि महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे अत्यांत गरजेचे आहे. डोळयांमुळे आपण हे जग, निर्सग पाहू शकतो. डोळ्यांचे आरोग्य जपताना योग्य आहार अत्यंत महत्वाचा असतो.  

आहारातील पोषक तत्वे फक्त शरीरालच नव्हे तर डोळ्यांसाठी देखील गरजेचे असतात. पण हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही तुमच्या आहारात डोळ्यांचे आरोग्य जपणाऱ्या पदार्थांचा सामावेश कराल. डोळ्यांची नजर कमजोर होऊ नये यासाठी तुम्हाला खुप सारे पोषक तत्व असलेल्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.

Image may contain: one or more people and close-up, text that says "सकाळ ത"

दिनचर्येतील चुका आजाराचे मूळ कारण; डॉक्टर म्हणाले, थोडी काळजी घेतल्यास आजार दूर पळतील

डोळ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आहारात ड्राय फ्रुट आणि नट्स जसे की, बदाम, आकरोड, शेंगदाणे, सुर्यफुलाचे बीज यांचा अधिक वापर केला पाहिजे. कारण यामध्ये व्हिटॅमिन  ईची मात्रा जास्त प्रमाणात असतात. व्हिटॅमिन ई डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.  व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळे  डोळ्याची दृष्टी कमजोर होते.

आरोग्यमय जीवनासाठी फळे-भाज्यांचे सेवन वाढवा

चला तर मग तुम्हाला आज अशा पदार्थांबाबत माहिती देणार आहोत ज्यामुळे डोळ्यांची नजर तीक्ष्ण होण्यासाठी मदत करेल.

डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी  या 5 पदार्थांचा आहारात सामावेश करा. 
1. भाज्या :  हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असल्याचे मानले जाते.  हिरव्या पाले भाज्यांमध्ये लोह आणि व्हिटॅमिनचे प्रमाण जास्त असते. जे डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी आणि आरोग्य मदत करतात. Green Vegitable

2. ड्राय फ्रुट्स : ड्राय  फुट्स  आणि नट्स  चा आहारात मोठ्या प्रमाणात समावेश केला पाहिजे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटमिन ई असते.  डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ई अत्यंत फायदेशीर ठरते. ड्राय फ्रुट्स खाणे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
dry Fruits

 

तुमच्या मुलांनाही अत्यंत राग येतोय? मग 'अशी' करा रागातून मुक्तता

3. गाजर : गाजरमध्ये व्हिटमिन सी चे खूप जास्त प्रमाण असते. गाजराचा रस पिणे आरोग्यासाठी लाभादायी असतेच त्याचबरोबर डोळ्यांसाठी देखील उपयुक्त ठरते.  रोज एक ग्लास गाजराचा रस प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते. 
carrot

4.सोयबीन : तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल तर तुम्ही सोयबीत खाऊ शकता. सोयाबीन मध्ये भरपूर पोषक तत्त्वे असतात. सोयबीन चा आहारात सामावेश केल्याने दृष्टी वाढते आणि डोळ्यांचे आरोग्य जपण्यास मदत होते. 

soyabeen

हृदयाचा सच्चा दोस्त लसूण; अंकूरलेल्या लसणाचे आहेत खूप सारे फायदे

5.अंडे : अंड्यामध्ये अमिनो अॅसिड, प्रोटीन सल्फर, लॅक्टीन, ल्युटीन, सिस्टीन आणि व्हिटमिन बी ही पोषक तत्त्वे असतात. व्हिटॅमिन बी पेशींच्या कार्यक्षमतेमध्ये महत्वपुर्ण काम करते. अंड्याचा आहारात सामावेश केल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. 
EGG

(टीप : सदर बातमी फक्त माहितीसाठी आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपाय करावे.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Include 5 foods in the diet to improve eyesight