Latest Marathi News | सर्दी, खोकल्याने नागरिक बेजार; ग्रामीण भागात संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sickness

सर्दी, खोकल्याने नागरिक बेजार; ग्रामीण भागात संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांत वाढ

वावडे (ता. अमळनेर) : तालुक्यात वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी, तापाचे रुग्ण वाढत असून, ग्रामीण भागात ही संख्या कमालीची वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. (Latest Marathi News)

सर्दी-खोकल्याचे विषाणू म्हणजेच एन्फ्ल्यूएन्झा व्हायरसमुळे रुग्ण आजारी पडतो. काही वेळा सर्दी, खोकला, फ्लू विषाणूजन्य नसून जीवाणूंमुळे होतात. अशा वेळेस ताप येणे, कान फुटणे, छातीत कफ होऊन न्यूमोनिया होणे अशा समस्या उद्भवतात. त्यासाठी वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिजैविके घ्यावी लागतात. बालदमा हे छातीत कफ होण्याचे दुसरे वाढत जाणारे कारण आहे. त्याचेही वेळीच निदान, औषधे, वाफ आदी उपचार आजाराच्या सुरवातीलाच केले, तर नंतरची गुंतागुंत टाळता येते.

हेही वाचा: पावसाळ्यात अशी वाढवा मुलांची इम्युनिटी

पावसाळ्यात मुलांची, विशेषत: शिशू वयातील मुलांची पोटे नाजूक झालेली असतात. खाण्यात थोडाफार बदल झाला, बाहेरचे खाण्यात आले, तरी पोट बिघडते. मग उलट्या, जुलाब, त्यातून शरीरा बाहेर जाणारे पाणी हे सगळे सुरू होते. अशावेळेच वेळीच डॉक्टरांना दाखवून वेळीच उपचार घ्यावा. अस्वच्छ अन्न, पाणी हे टायफॉइड (विषमज्वर) आणि कावीळ या दोन आजारांचे कारण बनू शकतात. या दोन्ही आजारांचे वेळीच निदान आणि संपूर्ण उपचार आवश्यक असतात.

मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया हे तिन्ही आजार डासांमार्फत पसरतात. थंडी वाजून विशिष्ट वेळापत्रकाप्रमाणे येणारा मलेरियाचा ताप किंवा ताप, अंगदुखी, पुरळ आणि पाठोपाठ कमी होणाऱ्या प्लेटलेट्स ही डेंग्यूची लक्षणे. तापाबरोबर खूप सांधेदुखी ही चिकनगुनियाची लक्षणे. या सगळ्यांत डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्या, नियमित उपचार हे महत्त्वाचे आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञ यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: निराधार महिलेकडून 2 हजारांची लाच घेताना तहसीलच्या शिपायाला अटक

''पावसाळ्यात पाणी स्वच्छ नसते. त्यामुळे पाणी गाळून, उकळून प्यावे, उघड्यावरील पदार्थ, शिळे अन्न खाणे शक्यतो टाळावे. मांसाहार, मसालेदार पदार्थ, वातजन्य पदार्थ पावसाळ्यात टाळावे. शाळेतल्या मुलांनी पाण्याची बाटली घरून न्यावी. बाहेरचे पाणी शक्यतो टाळावे. स्वतःची आणि आपल्या प्रियजनाची काळजी घ्यावी.'' - डाॅ. शुभम पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र, मांडळ

Web Title: Increase In Infectious Disease Patients In Rural Areas In Jalgaon District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top