प्रेग्नंसीनंतर वजन वाढलंय? काजल अग्रवालच्या या टिप्सने व्हा कमी वेळात एकदम फीट

चांगला आहार आणि कमी हालचाल यामुळे सहसा महिलांच प्रेग्नंसीत वजन वाढतं. पण आता ते झटपट कमी करता येईल.
Fitness Tips
Fitness Tipsesakal

Kajal Agraval After Pregnancy Fitness Tips : प्रेग्नंसी म्हटली की जेवढा आनंद असतो त्यापेक्षा सगळं नीट व्हावं म्हणून काळजी घेणंही आवश्यक असतं. त्यामुळे योग्य आहार आणि भरपूर आराम यामुळे बहुतेक महिलांचं प्रेग्नंसीमध्ये व नंतर वजन वाढलेलं असतं. आणि आता हे कमी कसं करायचं हा फार मोठा प्रश्न असतो.

मुल झाल्यानंतर तसं स्वतःकडे बघायला आणि द्यायला वेळही नसतो. पण महिलांनो, जर तुम्हाला खरंच परत पहिल्यासारखं फीट व्हायचं असेल तर प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल हिने प्रेग्नंसीनंतर कोणत्या ट्रिक्स वापरल्या, त्या टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Fitness Tips
Fitness Tipsesakal

बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभीनेत्री काजल अग्रवाल हिने मागच्यावर्षी मुलाला जन्म दिला. डिलीव्हरीनंतर आता ती परत इंडस्ट्रीत पदार्पणासाठी तयार झाली आहे. त्यासाठी तिने कोणत्या फिटनेस टिप्स वापरल्या जाणून घेऊया.

ओटमील

शरीराला पोषक तत्व योग्य प्रमाणात मिळावे म्हणून ती ग्लूटन फ्री ओटमील सोबत फळे आणि नट्स यांचे सेवन करते.

Fitness Tips
Fitness Facts : तुम्हालाही वाटतं रोज १० हजार पावलं चालल्याने खरंच फीट होतो? जाणून घ्या सत्य
Fitness Tips
Fitness Tipsesakal

उत्तपा - पचण्यास हलका असणारा उत्तपा खाणेही काजलला फार आवडते. त्यासोबत चटणी. ज्यामुळे अनेक व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स त्यातून मिळतात.

पनीर - प्रोटीनची आवश्यकता भरून काढण्यासाठी ती पनीर खाते. पेरीपेरी मसाल्यासोबत ग्रील्ड पनीर खाणे तिला आवडते.

जीम - डाेट बरोबर व्यायाम करणंही फार आवश्यक असतं. त्यामुळे काजल जीमही नियमीत करते.

Fitness Tips
Fitness Tips : सौंदर्य वाढवणारा कपालभाती प्राणायाम करताना या चुका टाळा; नाहीतर...

लेग प्रेस - या व्यायमामुळे पाय टोन्ड होण्याबरोबरच त्याचे स्नायूही मजबूत होण्यास मदत मिळते.

पिलाटे - पिलाटेमुळे शरीर लवचिक होऊन टोन्ड फीगर मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com