esakal | डेंटल इम्प्लांट्स केलंय? मग त्रासदायक ठरणाऱ्या ८ सवयींना ठेवा दूर
sakal

बोलून बातमी शोधा

डेंटल इम्प्लांट्स केलंय? मग त्रासदायक ठरणाऱ्या ८ सवयींना ठेवा दूर

काही जण डेंटल इम्प्लांट्स केल्यानंतर बेफिकीर होऊन वाट्टेल ते पदार्थ खातात.

डेंटल इम्प्लांट्स केलंय? मग त्रासदायक ठरणाऱ्या ८ सवयींना ठेवा दूर

sakal_logo
By
शर्वरी जोशी

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच प्रत्येक अवयवाची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. सध्याच्या काळात प्रत्येक जण पौष्टिक पदार्थांऐवजी फास्टफूड किंवा जंकफूड खाण्यावर भर देतांना दिसतो. परंतु, या पदार्थांचा विपरित परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असतो. अगदी केसांपासून दातांपर्यंत याचे परिणाम दिसू लागतात. बऱ्याचदा चॉकलेट्स,तत्सम गोड पदार्थ, चहा-कॉफी अशा पदार्थांचं सेवन केल्यामुळे दात किडणे, दातांवर डाग पडणे, दात अर्धवट तुटणे  अशा समस्या जाणवू लागतात. त्यामुळे मग अशा वेळी दंततज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. यामध्येच अनेक जणांना डेंटल इम्प्लांट्स करावं लागतं. परंतु, काही जण डेंटल इम्प्लांट्स केल्यानंतर बेफिकीर होऊन वाट्टेल ते पदार्थ खातात. परिणामी, पुन्हा दातांविषयी समस्या डोकं वर काढू लागते. म्हणूनच आज डेंटल इम्प्लांटस म्हणजे काय आणि ते केल्यानंतर दातांची काळजी कशी घ्यावी ते पाहुयात.

डेंटल इम्प्लांटस म्हणजे काय?

अनेकदा अपघात झाल्यामुळे किंवा काही अन्य कारणांमुळे तरुणपणात दात पडले तर ही ट्रिटमेंट केली जाते. या ट्रिटमेंटमध्ये दात पडलेल्या जागी दुसरा नवा दात बसवला जातो.जो दात पडला आहे त्या ठिकाणी स्क्रू फिट करुन दात लावला जातो. जो तुमच्या इतर दातांसारखाच दिसतो.

डेंटल इम्प्लांटस केल्यावर घ्या ही काळजी

१. डेटंल इम्प्लांट सर्जरी झाल्याच्या काही तास गरम खाद्यपदार्थ खाता येत नाहीत.

२. ही सर्जरी झाल्यानंतर लगेच पाणीही पिता येत नाहीत. कारण, बऱ्याचदा पाणी पितांना आपण ते भराभर पितो. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे दातांवर बसवलेली ग्रीप सैल होण्याची शक्यता असते. 

३. मद्यपान करता येत नाही.

४. कुरकुरीत किंवा दातात अडकतील असे पदार्थ खाता येत नाहीत.

५. चहा कॉफीचं सेवन केलं तर त्याचे डाग लगेच या दातांवर पडतात. त्यामुळे चहा कॉफी पिता येत नाही.

६.बटाट्याचे चिप्स, कॉर्न चिप्स असे स्टार्चयुक्त पदार्थ खाणे टाळा. कारण असे पदार्थ दातांमध्ये जाऊन चिकटतात. ते काढताना बसवलेला दात निघण्याची किंवा सैल होण्याची शक्यता असते.

७.कडक कँडी, चॉकलेट असे पदार्थही तुम्ही टाळायला हवे. कारण असे पदार्थ तुमच्या दातांना दुखावू शकतात.

८.पिझ्झा,बर्गर अशा ओढून आणि तोंड ताणून खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपासूनही दूर राहा कारण असे पदार्थ तुमच्या दातांमध्ये चिकटतात.

(डॉ. चिराग देसाई हे मुंबईतील व्हॉकहार्ट रुग्णालयात दंत चिकित्सा आणि मॅक्सिलोफेशिअल सर्जरी विभागाचे  प्रमुख आहेत.)

loading image