
अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव कसा वाचवावा त्यांच्यावर प्रथमोपचार कसे करावे हेच माहिती नसते त्यामुळे समस्या निर्माण होते. घरी कोणाची प्रकृती बिघडली तर कसे प्रथमोपचार करावे हेही लोकांना माहिती नसते, मात्र आता चिंता करू नका. आम्ही तुमहाला प्रथमोपचार कसे करावे याबद्दल काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत.
नागपूर : प्रत्येक व्यक्तीला सुखी समाधानी आणि निरोगी आयुष्य हवे असते. मात्र आपल्या जीवनात सुखी आयुष्य जगत असताना कधी काय घडेल काहीही सांगता येत नाही. आपले आयुष्य चांगल्या वाईट घटनांनी भरलेले असते. पण या सर्व घटनांचा सामना करण्याची शक्ती आपल्याकडे असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ आपल्यासमोर अनेकदा अपघात होतात . मात्र अनेकांना अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव कसा वाचवावा त्यांच्यावर प्रथमोपचार कसे करावे हेच माहिती नसते त्यामुळे समस्या निर्माण होते. घरी कोणाची प्रकृती बिघडली तर कसे प्रथमोपचार करावे हेही लोकांना माहिती नसते, मात्र आता चिंता करू नका. आम्ही तुमहाला प्रथमोपचार कसे करावे याबद्दल काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत.
हेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला
शांत रहा व रुग्णाला मानसिक आधार द्या.
रोग्याला वाचवतांना प्रथम तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवा. घडणा-या प्रसंगाकडे बघुन काय पाउल ऊचलायचे ते ठरवा. जेव्हा शक्य असेल तेव्हा रक्तापासुन किंवा शरीरातील द्रव्यापासुन स्वसरक्षणासाठी हातमोजे घाला.
बिकट प्रसंगी रोग्याची जिभ टाळुला अडकलेली नाही किंवा काही वस्तु त्यात अडकलेली नाही याची खात्री करुन घ्या. त्याचा श्वासोश्वास नीटपणे चालु रहायला हवा. आणि नसेल तर त्याला कृत्रिम श्वास देण्याची लगेच गरज असते.
जसे तुम्ही रक्त येते का हे पहाल तेव्हा, त्याचा रक्त प्रवाह आणि ह्यदयाचा ठोका देखील संथ आहे हे पहा. तर रक्त प्रवाह जोरात असेल,त्याने विष प्यायले असेल किंवा त्याच्या ह्यदयाचे ठोके बंद झाले असतील तर त्वरीत धावपळ करा. अशा वेळी प्रत्येक क्षण महत्वाचा आहे.
ज्या माणसाच्या मानेवर किंवा पाठीवर आघात झाले असतील त्याला मुळीच हलवु नका ज्याने तो पुढील अपघातांपासुन वाचेल. जर त्याला वांती झाली आणि तुम्हाला खात्री आहे की त्याची मान ठीक आहे तर त्याला, कुशीवर करा आणि त्याला गरम ठेवण्यासाठी एखादे पांघरुण घाला.
तुम्ही प्रथमोपचार देत असतांना वैद्यकीय मदतीसाठी कोणालातरी बोलवायला पाठवा. जो डाँक्टरला बोलवायला गेला त्याने डाँक्टरला गंभारतेची परिस्थिती समजावुन सांगा आणि रुग्णवाहीका येई पर्यंत काय प्रथमोपचार करावेत हे त्यांना विचारुन घ्या.
अर्धजागृत वा बेशुद्ध माणसाला कोणतेही पेय देऊ नका. पेय त्याच्या श्वासनलीकेत अडकुन त्याच्या श्वासोश्वासात विघ्न येऊ शकते. बेशुद्ध माणसाला पलवुन किंवा थापडुन जागविण्याचा प्रयत्न करु नका.
त्याचे वैज्ञानिक परिक्षणाची काही माहीती मिळते का ते पहा तो काही औषधांना अँलर्जीक असु शकतो किंवा त्याला कोणता भयंकर रोग असु शकतो ज्यात खास काळजीची गरज पडेल.
संपादन - अथर्व महांकाळ