वर्कआउट केल्यानंतर तुम्हालाही अशक्तपणा जाणवतो का? मग 'या' पदार्थांचं सेवन नक्की करा 

Know which foods are healthy after workout
Know which foods are healthy after workout

नागपूर : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यात वातावरण बदलामुळे अनेकांना सर्दी, खोकला, ताप यांसारखे व्हायरल इन्फेक्शन होत आहेत. म्हणूनच शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी अनेक जण जिममध्ये किंवा घरी योगा किंवा वर्कआउट करत आहेत. मात्र अनेकांना वर्कआउट केल्यानंतर अशक्तपणा जाणवतो किंवा वर्कआउटनंतर शरीरातील एनर्जी निघून गेल्यासारखी वाटते. त्यामुळे अशे काही पदार्थ खाणं महत्वाचं आहे जे तुमच्या शरीरात ऊर्जा आणण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतात. म्हणूनच आज आम्ही असे पदार्थ तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा राहील आणि तुम्हाला थकवा जाणवणार नाही. चला तर मग जाणून घेऊया. 

सूप 

तयार करण्यासाठी सोपं आणि सर्वात हेल्दी असा कुठला पदार्थ असेल तर तो म्हणजे सूप. वर्कआउटनंतर कुठलाही सूप पिणं महत्वाचं आहे. सूपमध्ये असलेल्या भाज्यांमुळे आणि यातील गुणधर्मांमुळे शरीर हेल्दी राहण्यास मदत होते. तसंच सर्दीपासून बचाव करण्यासाठीही सूप पिणं फायदेशीर आहे. त्यामुळे दररोज वर्कआउटनंतर सूप नक्की प्या. 

हॉट चॉकलेट

चॉकोलेट आवडत नाही अशी व्यक्ती जगात शोधून सापडणार नाही. त्यामुळे दररोज वर्कआउटनंतर जर कोणी चॉकलेट खाण्यास सांगितलं तर आपण नक्कीच खाऊ. पण हॉट चॉकलेटमध्ये काही औषधी गुणधर्मही आहेत. दररोज वर्काउटनंतर हॉट चॉकलेटचं सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील थकवा निघून जातो. तसंच चॉकलेटमुळे ताण कमी होण्यास मदत होते. 

तुळशीचे बी 

तुळशीच्या बियांमध्ये प्रोटीन, फायबर, मँगनीज, फास्फोरस आणि कॅल्शियम सारखे पोषक तत्व असतात. ज्यामुळे तुम्हाला वर्काउटनंतर शक्ती मिळते. तसंच यामुळे तुमच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढते. 

क्विनोआ बाउल

जर का तुम्ही वजन कमी करण्यासोबतच अनेक प्रकारचे गंभीर आणि तीव्र आजारांपासून मुक्त होऊ इच्छित असाल तर तुम्हाला आपल्या डाएटमध्ये भाताऐवजी ब्लॅक क्विनोआ जरूर समाविष्ठ करणं आवश्यक आहे. क्विनोआ हे केवळ चवीचा नाहीतर आरोग्याचा खजिना आहे. जे शाकाहारी लोकं चवदार आणि निरोगी अन्नासाठी तळमळत असतात. त्यांच्यासाठी ब्लॅक क्विनोआ सर्वांत चांगला पर्याय आहे. 

 संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com