गर्भपूर्व मानसचिकित्सा

मधुरा पाटील
Monday, 20 April 2020

साधारणपणे लग्नाला २/ २.५ वर्षे झाली कि दोघांच्याही घरच्यांकडून “ आता नविन पाहुणा कधी? “ अशी विचारणा चालू होते. या दोघा नवरा-बायकोला पण आपले स्वतःचे मूल असावे असे वाटायला लागते.  तसेचं आपली गर्भधारणा नैसर्गिक असावी असेही प्रत्येक दांपत्याला मनापासून वाटत असते. कारण शास्त्राने खूप प्रगती केली असली तरी त्या सर्व उपचारांचा आपल्या शरीरावर काहीतरी घातक परीणाम होणार याची पण पूर्ण कल्पना असते.

साधारणपणे लग्नाला २/ २.५ वर्षे झाली कि दोघांच्याही घरच्यांकडून “ आता नविन पाहुणा कधी? “ अशी विचारणा चालू होते. या दोघा नवरा-बायकोला पण आपले स्वतःचे मूल असावे असे वाटायला लागते.  तसेचं आपली गर्भधारणा नैसर्गिक असावी असेही प्रत्येक दांपत्याला मनापासून वाटत असते. कारण शास्त्राने खूप प्रगती केली असली तरी त्या सर्व उपचारांचा आपल्या शरीरावर काहीतरी घातक परीणाम होणार याची पण पूर्ण कल्पना असते. त्यामुळे अशा दांपत्याची या संदर्भात मिळेल तिथून माहिती गोळा करणे चालू होते. तर आपण आज या लेखात गर्भधारणा राहण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते बघणार आहोत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपल्या सर्वांना हे माहित आहेचं कि मुलाची प्रकृति पूर्णपणे आई- वडिलांवर अवलंबून असते. त्यामुळे सुदृढ, निरोगी आणि आनंदी बाळ हवे असेल तर सर्वप्रथम आई-वडील तसे असणे अतिशय आवश्यक आहे. पण सध्या आजूबाजूला बघतां असे दिसून येते कि गर्भधारणा रहावी यासाठी शारीर तंदुरुस्तीचा जितका विचार केला जातो त्याच्या पावपट पण मानसिकतेचा किंवा मनाचा विचार केला जात नाही. खरेतर “ दिवस राहणे “ ही फक्त शारीर प्रक्रिया नाहीये त्यात त्यापेक्षा जास्त मनाचा अंतर्भाव आहे. शरीराच्या निरोगीत्वासाठी जसे काही वेळा काही औषधे / पंचकर्मे यांचा विचार केला जातो तसाचं मनःस्वास्थ्याचा विचार करणे आवश्यक आहे. तो कसा करायचा ते बघू यात.

सर्वात महत्वाचे म्हणजे आनंदी रहा. विशेषकरून नोकरी करत असाल तर घरी आल्यावर अतिशय आनंदी / उत्साही रहा. घरी आल्यावर अॉफिसच्या कामाचा विचार करू नका. घरी आल्यावर परत शक्यतो अॉफिसचे काम करणे टाळा.

घरी आल्यावर आपला वेळ आपल्या जोडीदाराबरोबर आरामात घालवा. त्यामुळे दिवसभर आलेला कामाचा शीण निघून जाईल.

आपल्या मनःशांतीसाठी कोणतेही श्लोक / स्तोत्र यांचे नित्यनेमाने पठण करत जा. यामुळे रोजच्या गतीमान जीवनशैली मुळे येणारे ताण-तणाव कमी होण्यास मदत होईल.

जर प्राणायम करता येत असेल ( रितसर शिकला असाल तर ) तर रोज करत जा. जर येत नसेल तर फक्त दीर्घश्वसन केलेत तरी चालेल. यामुळे आपले मन शांत राहण्यास मदत होईल. काहीवेळा क्षुल्लक कारणांवरून जी आपली चीडचीड होत असते ती कमी होईल. आपली चीडचीड कमी होणे अतिशय आवश्यक आहे कारण त्यामुळे वाढणारी उष्णता गर्भधारणेत अडथळा ठरू शकते.

अशारितीने मानसिक आणि शारीरिक निरोगीत्व असेल तर विनासायास गर्भधारणा काहीही औषधोपचार न करता राहील. पण काही वेळेस असे घडत नाही.

प्रामाणिक प्रयत्न करूनही जर गर्भधारणा झाली नाही, तर तपासण्या आणि औषधोपचारांचे वेगळेचं सत्र चालू होते. इथे आपल्या मानसिकतेचा खरा कस लागतो. काहीवेळा दोघांमध्ये किंवा काहीवेळा एकामध्ये काही शारीर दोष असू शकतो. तो दोष काही काळ औषधे घेतल्याने बरा होऊन गर्भधारणा राहू शकते. अशावेळी दोघांनी या प्रसंगाला खंबीरपणाने आणि तो  “ आपला एकत्रित प्रश्न आहे “ अशा विचारांनी त्याकडे बघितले पाहिजे. कारण दोघांपैकी एकात दोष असेल तर तो निराशेच्या गर्तेत जाऊ शकतो.  ही त्याची निराशा किंवा स्वतःला दोषी समजण्याची वृत्ती गर्भधारणा होण्यात अडथळा ठरू शकते. त्यामुळे दोष जरी एकात असला तरी दोघांनी अतिशय सामंजस्याने वागले पाहिजे म्हणजे अपेक्षित निकाल लवकर आणि चांगला लागेल.
- वैद्य सौ. मधुरा पाटील, फोन- ९८२२३०९८१४


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhura patil writes about mental health before pregnancy