मिस वर्ल्ड होण्यासाठी काय काय केले मानुषीने

मानुषी छिल्लर
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

मी ‘मिस वर्ल्ड’ बनण्याचे मनावर घेतले तेव्हाच मी वर्कआऊट आणि डाएट या गोष्टी सुरू केल्या. आपण कोणता व्यायाम कशासाठी करत आहोत, हे लक्षात घेऊनच मी व्यायाम करत असते. मी आठवड्यातून ४ ते ५ वेळा जिमला जाते.

स्लिम फिट - मानुषी छिल्लर, अभिनेत्री
मी ‘मिस वर्ल्ड’ बनण्याचे मनावर घेतले तेव्हाच मी वर्कआऊट आणि डाएट या गोष्टी सुरू केल्या. आपण कोणता व्यायाम कशासाठी करत आहोत, हे लक्षात घेऊनच मी व्यायाम करत असते. मी आठवड्यातून ४ ते ५ वेळा जिमला जाते. त्याव्यतिरिक्त मी स्क्वॅट्स, धावणे असे प्रकार करते. योगाला मी माझ्या वर्कआऊटमध्ये जास्त महत्त्व देते. त्यामुळे मी रोज योगासने करते. योगासनांमुळे शरीराची लवचिकताही वाढते. मी प्लॅंक्सही करते. त्यामुळे तुमच्या शरीरावर योग्य ताण येऊन स्नायू चांगले राहतात. 

डाएटच्या बाबतीत मी फारच दक्ष आहे. दिवसभराचे जेवण मी ६ भागात विभागले आहे आणि या सगळ्यातून जास्त प्रमाणात प्रथिने खाल्ली जातील, याकडे मी लक्ष देते. सकाळी उठल्यावर मी एक ग्लास साधे पाणी किंवा लिंबू पाणी पिते. त्यानंतरच्या नाश्‍त्यामध्ये दह्यासोबत ओट्स किंवा गव्हाचे फ्लेक्स, ताजी फळे आणि शेंगदाणे खाते. दुपारच्या जेवणात मी भाजीसोबत १ ते २ चपाती किंवा १ वाटी भात, सलाड आणि रायता खाते. संध्याकाळच्या नाश्‍त्यामध्ये फळांची स्मुदी आणि दह्यासोबत काकडी व गाजर खाते. रात्रीचे जेवण मी बरोबर ७ वाजता घेते. यामध्ये क्विनोचे सलाड किंवा पुलाव खाते. सूपसोबत चणे, मका आणि टोफूचे सलाड खाते. रात्रीच्या जेवणानंतर फक्त ताजी फळे खाते. 

मी स्वतःसाठी नियमच ठरवला आहे. तो म्हणजे, नाश्‍ता कधीही चुकवायचा नाही आणि गोड पदार्थ खायचे नाहीत. पाणीही भरपूर प्रमाणात पिते. त्याचबरोबर मी ७ ते ८ तास चांगली झोप काढते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miss world manushi chhillar yoga fitness