Health Blog: अर्धकपोतासन;फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yoga

Health Blog: अर्धकपोतासन;फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते

असे करावे आसन

प्रथम वज्रासनात बसावे. त्यानंतर एक पाय मागच्या बाजूला ताणून घ्यावा. वज्रासनामध्ये आहे तो पाय आतल्या बाजूला दुमडून घ्यावा. त्यानंतर दोन्ही हात वरच्या दिशेला ताणून घ्यावे.

हाताची नमस्कार स्थिती असावी. दोन्ही दंड कानांना टेकलेले असावेत. त्यानंतर कंबरेतून थोडेसे मागच्या बाजूला वाकावे.

आसनस्थिती सोपी आहे परंतु त्यामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा. जो पाय पुढे दुमडला आहे त्या पायाचा तळवा मागे असणाऱ्या पायाच्या मांडीला टेकवावा.

श्‍वसन संथ सुरू असावे. आसनस्थिती सावकाश सोडून दुसऱ्या बाजूनेही करावे.

आसनाचा फायदा

आसनाच्या सरावाने पाठीची लवचिकता वाढते व पुढे कपोतासनची स्थिती घेण्यास मदत होते.

पाठीचे, कंबरेचे स्नायू अधिक सुदृढ होतात. पाठदुखी, कंबरदुखी कमी होते.

श्‍वसनाच्या तक्रारी, बालदमाचा त्रास आहे, खूप दम लागतो अशा मुलांना स्टॅमिना वाढण्यास मदत होते. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.

खांदे, मान, दंड यांना ताण बसल्याने ते अधिक सुदृढ होतात. पोश्‍चर सुधारण्यासही मदत होते. अतिरिक्त चरबी कमी होते.